Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी टेवोल्डे गेब्रेमरियम (Tevold Gebremariam) यांची एअर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेब्रेमरियम हे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) चे नेतृत्व स्वीकारण्याच्या उंबरठ्यावर असतानाच टाटा समूहाने वेगाने हालचाली करत त्यांना एअर इंडियात आणले. (Air India New CEO)



पाकिस्तानच्या परवानग्यांमुळे संधी हुकली :


माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या खासगीकरणानंतर गेब्रेमरियम (Tevold Gebremariam) यांची CEO म्हणून निवड जवळपास निश्चित झाली होती. आरिफ हबीब समूहाच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने त्यांना पसंती दिली होती. मात्र, पाकिस्तान सरकारकडून आवश्यक सुरक्षा मंजुरी मिळण्यात विलंब होत होता. ही प्रक्रिया रखडल्याने अधिकृत घोषणा होऊ शकली नाही. याच दरम्यान टाटा समूहाने पुढाकार घेत गेब्रेमरियम यांच्याशी चर्चा पूर्ण केली आणि त्यांची एअर इंडियाच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती केली. (Air India New CEO)



कॅम्पबेल विल्सन यांची जागा घेणार :


गेब्रेमरियम (Tevold Gebremariam) हे एअर इंडियाचे दुसरे परदेशी CEO ठरणार आहेत. ते कॅम्पबेल विल्सन यांची जागा घेतील. विल्सन यांनी यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला होता. एअर इंडिया सध्या मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असून, विमान ताफ्याचा विस्तार, सेवा सुधारणा आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्थान निर्माण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. त्यामुळे नव्या CEO वर मोठी जबाबदारी असणार आहे. (Air India New CEO)



अनेक दिग्गजांमधून निवड :


नवीन CEO निवडताना एअर इंडियाने देश-विदेशातील अनेक अनुभवी उमेदवारांचा विचार केला होता. कंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी निपुण अग्रवाल यांचे नावही चर्चेत होते. मात्र, विविध कारणांमुळे अखेर टेवोल्डे गेब्रेमरियम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Air India New CEO)



कोण आहेत टेवोल्डे गेब्रेमरियम?


टेवोल्डे गेब्रेमरियम (Tevold Gebremariam) यांनी इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपमध्ये तब्बल 40 वर्षे सेवा बजावली आहे. 2011 ते मार्च 2022 या कालावधीत त्यांनी कंपनीचे CEO म्हणून काम पाहिले.


त्यांच्या नेतृत्वाखाली इथियोपियन एअरलाइन्सने उल्लेखनीय प्रगती केली. एक प्रादेशिक विमान कंपनी म्हणून ओळख असलेल्या संस्थेचे त्यांनी आफ्रिकेतील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक नफा कमावणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एकात रूपांतर केले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे इथियोपियन एअरलाइन्सने जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात मजबूत स्थान निर्माण केले. (Air India New CEO)



एअर इंडियाच्या परिवर्तनाला नवी दिशा?


टाटा समूहाने एअर इंडिया (Air India) ताब्यात घेतल्यानंतर कंपनीच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. शेकडो नव्या विमानांची ऑर्डर, सेवा गुणवत्ता सुधारणा, आंतरराष्ट्रीय मार्गांचा विस्तार आणि ग्राहक अनुभव उंचावण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत जागतिक विमान उद्योगाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या टेवोल्डे गेब्रेमरियम यांच्या नेतृत्वामुळे एअर इंडियाच्या परिवर्तनाला आणखी वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Air India New CEO)

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या