मुंढेंच्या ‘सावजी मटण' विधानावर प्रतिक्रिया
नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEO) टेड सारंडोस (Ted Sarandos) ...
मुंबई : "सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा हा रोजगाराचा आधार असून, व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत," असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेत महसूल मंत्र्यांनी सावजी व्यवसायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली आहे.
मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ...
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात "मी जर हे सावजी मटण खाल्ले, तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल," असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे सावजी रेस्टॉरंट चालकांमध्ये असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांच्या अशा वक्तव्यांवर आक्षेप नोंदवला.
संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे ...
बावनकुळे म्हणाले, विदर्भामध्ये गेली तीन-चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धती आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावजीच्या जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, इतकी या अन्नाची लोकप्रियता आहे. हे खास मसाले इतर कोणीही बनवू शकत नाही. आज जगातल्या अनेक देशांमध्ये सावजीच्या पदार्थांना मोठी मागणी असताना, एका अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगावर अशी सरसकट आणि नकारात्मक टिप्पणी करणे पूर्णपणे अयोग्य आहे.
मुंबई : चर्चेत राहिलेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर काही महिन्यांनी प्रसिद्ध कॉमेडीयन प्रणित मोरे (Pranit More) पुन्हा एकदा 'स्टँड-अप कॉमेडी'च्या (Stand Up ...
महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, अन्नात कुठे भेसळ किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी गोष्ट आढळल्यास त्या विशिष्ट ठिकाणी कारवाई करण्यास कोणाचीही अडचण नाही. परंतु, संपूर्ण सावजी व्यवसायाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. या व्यवसायाला फटका बसेल किंवा रेस्टॉरंट्स बंद पडतील, अशा स्वरूपाची वक्तव्ये अधिकाऱ्यांनी टाळावीत, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.






