मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या १०व्या मजल्यावरून एक महिला खाली पडली. मात्र, सुदैवाने ती थेट जमिनीवर न पडता इमारतीलगत असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली. त्यामुळे तिचा जीव वाचला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
महिला झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने तिला खाली आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी काळजीपूर्वक बचावकार्य केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर महिलेला झाडावरून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. दहाव्या मजल्यावरून पडूनही महिला थेट जमिनीवर आदळली नाही, यामुळे मोठा अनर्थ टळला. झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्यामुळे तिच्या पडण्याचा वेग कमी झाला आणि तिला सुरक्षित बाहेर काढण्याची संधी मिळाली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या ४९ ...
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, महिला झाडात अडकलेली आणि अग्निशमन दलाचे जवान तिची सुटका करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, महिला नेमकी कोणत्या कारणामुळे १०व्या मजल्यावरून पडली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तिची ओळख आणि प्रकृतीबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेने पुन्हा एकदा अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्पर बचावकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सुदैवाने झाडामुळे महिलेचा जीव वाचला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.