Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या अपघातात भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा या भीषण अपघातात जखमी झाला आहे. टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (२९) किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग करून त्याला पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. ( Jalgaon Accident News )
दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगला माळी (Mangala Mali) या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा (Pimprala) येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघाल्या होत्या. शहरातील महामार्गावरून जात असताना मागून भरधाव वेगाने एक टँकर आला आणि या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोघे मायलेक रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी या रस्त्यावर कोसळताच टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. ( Jalgaon Accident News )
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने चालकाचे ...
टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग केला. नागरिकांनी काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर (Mahadev Hospital) टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नागरिकांच्या धाडसामुळे चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ( Jalgaon Accident News )
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) आणि इतर विविध संवर्गातील एकूण ...
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.