दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी दाट धूर, आगीच्या ज्वाळा आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावा करत व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. मात्र, संयुक्त अरब अमिराती (UAE) प्रशासनाने या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. (Dubai Explosion)
काही वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे 2.40 वाजता जेबेल अली परिसरात एका इमारतीला आग लागल्यानंतर स्फोटांचे आवाज ऐकू आले. दुबई शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 25 मैल अंतरावरील या परिसरातील तसेच अल फुरजान भागातील काही रहिवाशांनीही स्फोटांचे आवाज ऐकल्याचा दावा केला आहे. (Blast News)
येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जहाज उलटून बुडाले. या जहाजावरील 13 ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काळ्या धुराचे लोट आकाशात पसरताना दिसत आहेत. काही पोस्टमध्ये फ्लाइट ट्रॅकिंग नकाशे आणि आगीची दृश्येही शेअर करण्यात आली आहेत. (Dubai news)
दरम्यान, काही एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यांनी येमेनमधील हौथी बंडखोरांनी जेबेल अलीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यांना UAE सरकार, लष्कर किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेकडून पुष्टी मिळालेली नाही. काही पोस्टमध्ये औद्योगिक अपघाताची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. (Viral video)
विशेष म्हणजे, यापूर्वीही दुबई मीडिया ऑफिसने अशाच प्रकारच्या अपुष्ट स्फोटांच्या वृत्तांचे खंडन केले होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरील दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (UAE Breaking News)
सद्यस्थितीत स्फोटाचे नेमके कारण, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून, UAE प्रशासनाच्या निवेदनाची प्रतीक्षा आहे.





