Wildlife Smuggling : बांगलादेशातून आणून भारतात विक्री! CBI ने उघड केला वन्यजीव तस्करीचा मोठा रॅकेट

मुंबई : वन्यजीव तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यांनी संयुक्त कारवाईत प्रतिबंधित प्रजातींच्या अवैध व्यापाराचे जाळे उघड केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्जुन मंडल हा बांगलादेशातून संरक्षित वन्यजीव भारतात आणून त्यांची विविध राज्यांमध्ये विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.


गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील माचलंदापूर परिसरात छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-१ अंतर्गत संरक्षित असलेले १५ स्लो लोरिस आणि ६ इजिप्शियन गिधाडे जप्त केली. या प्रजातींना भारतात सर्वोच्च कायदेशीर संरक्षण आहे. (Crime)



तपासादरम्यान एका ठिकाणी मोठ्या पिंजऱ्यात सहा इजिप्शियन गिधाडे आढळली. आरोपी सैकत बिस्वासने ही गिधाडे अर्जुन मंडलने आणून ठेवली असल्याची कबुली दिली. तसेच अर्जुन मंडलचा साथीदार हिमांशू मंडल उर्फ मिथुन हा या प्राण्यांची देखभाल करत असल्याचेही त्याने सांगितले. (Wildlife Trafficking)


यानंतर अधिकाऱ्यांनी हिमांशू मंडलच्या घरावर छापा टाकला असता, गच्चीवरील आठ पिंजऱ्यांमध्ये १० स्लो लोरिस ठेवलेले आढळले. चौकशीत हिमांशूने हे प्राणी अर्जुन मंडलने आणल्याचे आणि त्यांना ठेवण्यासाठी आर्थिक मोबदला मिळत असल्याची कबुली दिली.


तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी संरक्षित वन्यजीवांचा भारतातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर व्यापार करत होते. या प्रकरणी CBI, मुंबईने अर्जुन मंडल, सैकत बिस्वास आणि हिमांशू मंडल या तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Bangladesh)

Comments
Add Comment

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या