मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Vaishya Vani Community)
वैश्य वाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, वरिष्ठ अधिकारी तसेच वैश्य वाणी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Vaishya Vani Community)
जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीतील अडचणींवर चर्चा :
बैठकीत वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. पूर्वी उपलब्ध असलेली कागदपत्रे, पुरावे आणि संबंधित प्रकरणांवर झालेली कार्यवाही विचारात घेऊन पात्र व्यक्तींना अनावश्यक पुनर्पडताळणीला सामोरं जावं लागू नये, अशी मागणी करण्यात आली. याबाबत मंत्री अतुल सावे यांनी, पूर्वीची कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे स्पष्ट असल्यास त्यांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला जावा, असं सांगितलं. पात्र व्यक्तींवर अनावश्यक पुनर्पडताळणीमुळे अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Vaishya Vani Community)
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थच्या गंभीर आजाराची ...
राज्य मागासवर्ग आयोगाकडून वस्तुनिष्ठ अभ्यास :
वैश्य वाणी समाजाशी संबंधित सामाजिक, शैक्षणिक आणि इतर निकषांचा वस्तुनिष्ठ विचार करण्यासाठी हे प्रकरण राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आयोगाने निर्धारित केलेले निकष, यापूर्वीचे अहवाल, उपलब्ध कागदपत्रे आणि पुरावे यांचा एकत्रित विचार करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. निर्धारित निकषांची पूर्तता होत असल्यास त्यानुसार संबंधित जातीचा विचार करावा आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे योग्य निर्णय घ्यावा, असे निर्देश मंत्री सावे यांनी दिले. यापूर्वी आयोगाने केलेली कार्यवाही आणि उपलब्ध अहवालांचीही दखल घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. (Vaishya Vani Community)
पात्र लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित ठेवू नका :
जात प्रमाणपत्राची वैधता शासनाच्या विविध योजना आणि सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रमाणपत्र पडताळणीतील अडचणींचा थेट परिणाम पात्र लाभार्थ्यांवर होऊ शकतो. या प्रक्रियेत अनावश्यक विलंब किंवा पुनरावृत्ती होऊ नये आणि पात्र व्यक्तींना शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Vaishya Vani Community)
पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती आता पुणे जिल्ह्यातील ...
शासनस्तरावर पुढील कार्यवाहीला गती :
या विषयावर राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकारी आणि शासनस्तरावर आवश्यक ती चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. बैठकीनंतर संबंधित बाबींचा सविस्तर आढावा घेऊन प्रकरणाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, उपलब्ध कागदपत्रे आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पात्र व्यक्तींना न्याय मिळेल, या दृष्टीने निर्णय प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. (Vaishya Vani Community)