Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला मदत करणाऱ्या देशांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणला आर्थिकदृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी सोमवारी ‘ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट’ची घोषणा केली. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने इराणकडून पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची आयात केल्याप्रकरणी भारतातील चार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. इराणसाठी संभाव्य महसुलाचे स्रोत रोखण्याच्या उद्देशाने अमेरिकेने हे नवे निर्बंध लागू केले आहेत. तसेच, इतर देशांनीही इराणसोबतचे आर्थिक संबंध तोडावेत, असे अमेरिकेने आवाहन केले असून, तसे न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, या कारवाईच्या कक्षेत भारतातील कस्टम ड्युटी ब्रोकर पोर्टईज पार्टनर्स एलएलपी तसेच त्यांचे भागीदार इंदरीसमिया अशरफमिया शेख आणि हरीश रामचंद्र रंगी यांचा समावेश आहे. या व्यक्तींनी इराणमधून पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या अनेक खेपांची आयात करण्यास मदत केली होती. (Donald Trump)



रिपोर्टनुसार, निर्बंधांच्या कक्षेत आलेल्या इतर कंपन्यांमध्ये सदाशिव ओव्हरसीज लिमिटेड, पीपी सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रकृतिस इन्फ्रा इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. पीपी सॉफ्टटेकचे संचालक प्रशांत गर्ग यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवेदनानुसार, शेख, रंगी आणि गर्ग हे तिघेही भारतीय नागरिक आहेत. सदाशिव ओव्हरसीजने सुमारे ६.९ कोटी डॉलर किमतीच्या इराणी पेट्रोलियम उत्पादनांची आयात केली. तर पीपी सॉफ्टटेक आणि प्रकृतिस इन्फ्रा यांनी प्रत्येकी सुमारे २.५ कोटी डॉलर किमतीच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात केली. इराणकडून पेट्रोलियम किंवा पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी, अधिग्रहण, विक्री, वाहतूक किंवा विपणनाशी संबंधित महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये जाणूनबुजून सहभागी झाल्याच्या आरोपावरून या कंपन्यांना निर्बंधांच्या यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी निवेदनात म्हटले, “इराणी राजवटीच्या अस्थिरता निर्माण करणाऱ्या कारवायांना मदत करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती आणि जहाजांविरोधात अमेरिकेने व्यापक कारवाई केली आहे.”दरम्यान, इराणने मध्यपूर्वेतील आपल्या शेजारी देशांना अमेरिकेसोबत मिळून इराणविरोधातील आर्थिक युद्धात सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. (Donald Trump)


इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नेते मोहसिन रजाई यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतेही पाऊल उचलल्यास इराण त्याला इतका तीव्र आणि मोठा प्रत्युत्तर देईल की सर्वांनाच त्याचा धक्का बसेल.त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शेजारी देशांनी इराणच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी अमेरिकेला मदत केली, तर इराण फारसच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांच्या मार्गांना बंद करू शकतो किंवा त्यांना लक्ष्य करू शकतो. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते की, अमेरिका इराणविरोधात इतिहासातील सर्वात कठोर आणि मोठी आर्थिक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.ट्रम्प यांनी म्हटले की, तेल तस्करी, पैशांचे हस्तांतरण किंवा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून इराणला कोणत्याही प्रकारची मदत करणाऱ्या देशांना अमेरिकेच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या कारवाईला ‘आर्थिक युद्ध’ असे संबोधले असून, आपल्या मित्रदेशांना इराणला पूर्णपणे एकाकी पाडण्यासाठी अमेरिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Donald Trump)

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान