US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत ट्रम्प प्रशासन असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय लागू झाल्यास अमेरिकेच्या इतिहासातील एकाच वेळी होणाऱ्या सर्वात मोठ्या व्हिसा रद्दीकरण मोहिमांपैकी एक ठरू शकतो. मात्र, या निर्णयाला न्यायालयीन आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ( Trump Administration)


अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अल्प-मुदतीच्या व्यावसायिक किंवा पर्यटक व्हिसावर अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर कायमस्वरूपी वास्तव्य मिळवण्यासाठी आश्रय प्रक्रियेचा वापर करणाऱ्या परदेशी नागरिकांवर या कारवाईचा परिणाम होऊ शकतो. (Business Visa)



2016 ते 2026 दरम्यानचे व्हिसा रडारवर


असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या कागदपत्रांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय रोखला नाही किंवा प्रशासनाने तो मागे घेतला नाही, तर येत्या काही आठवड्यांत 2016 ते 2026 या कालावधीत जारी करण्यात आलेले काही B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. (America News)


ही कारवाई अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) सोबत समन्वयाने केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, अल्प-मुदतीच्या अभ्यागत म्हणून अमेरिकेत आले आणि त्यानंतर कायमस्वरूपी राहण्यासाठी आश्रयासाठी अर्ज केला, अशा व्यक्तींच्या नॉन-इमिग्रंट व्हिसाबाबत कारवाई करण्यासाठी DHS सोबत समन्वय सुरू आहे.


मात्र, नेमके किती व्हिसा रद्द केले जातील, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ही प्रक्रिया सुरू असल्याने संख्या बदलू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. (Visa Cancellation)



व्हिसा रद्द झाला म्हणजे लगेच हद्दपारी नाही


या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हिसा रद्द झाल्याने संबंधित व्यक्तीला तात्काळ अमेरिकेतून हद्दपार केले जाईलच असे नाही.


ज्या व्यक्तींचे आश्रय अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, त्यांच्या इमिग्रेशन स्थितीवर या कारवाईचा परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांचा B1 किंवा B2 या व्यावसायिक अथवा पर्यटक व्हिसावरील दर्जा संपुष्टात येऊ शकतो.


दरम्यान, या संभाव्य मोठ्या कारवाईला कायदेशीर आव्हान दिले जाण्याची शक्यता असल्याने पुढील काही आठवडे अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई