Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! १२ ऑगस्टला 'या' गाड्या रद्द, अनेकांचा मार्ग बदलला

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली–जळगाव दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत १२ ऑगस्ट रोजी भादली स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वाचे तांत्रिक काम करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून त्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. या ब्लॉकमुळे एकूण १४ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून ११ गाड्या विलंबाने धावणार आहेत.



१२ ऑगस्टला या गाड्या रद्द


नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे एकूण १४ गाड्या विविध दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी नंदुरबार–भुसावळ आणि भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर, नाशिक रोड–बडनेरा आणि बडनेरा–नाशिक रोड विशेष, इगतपुरी–भुसावळ आणि भुसावळ–इगतपुरी मेमू, देवळाली–भुसावळ आणि भुसावळ–देवळाली मेमू, दादर–भुसावळ आणि भुसावळ–दादर विशेष तसेच भुसावळ–कटनी एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. याशिवाय ११ ऑगस्ट रोजी सुरत–भुसावळ एक्स्प्रेस, तर १४ ऑगस्ट रोजी भुसावळ–सुरत आणि कटनी–भुसावळ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.



अनेक गाड्यांचा मार्ग बदलला


गाडी क्रमांक १७०१९ हिसार–हैदराबाद एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर–नांदेड एक्स्प्रेस या गाड्या त्यांच्या नियमित मार्गाऐवजी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन)–अकोला–पूर्णा मार्गे धावतील. त्यामुळे या मार्गावरील काही स्थानकांवरील प्रवाशांनी वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



नियोजित गाड्या उशिराने धावणार


मनमाड–जळगाव, खंडवा–भुसावळ आणि अकोला–जळगाव या विभागांतील वाहतुकीवर परिणाम होणार असून ११ एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात आले आहे. या गाड्या एक तास ते तीन तासांपर्यंत विलंबाने धावतील. यामध्ये बेंगळुरू–नवी दिल्ली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेस, यशवंतपूर–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, टर्मिनस–आसनसोल एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्स्प्रेस, अमृतसर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गोंदिया–कोल्हापूर एक्स्प्रेस, बनारस–हडपसर अमृत भारत एक्स्प्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्स्प्रेसचा समावेश आहे. गाडी क्रमांक २२५९० हडपसर–बनारस अमृत भारत एक्स्प्रेस १२ ऑगस्ट रोजी नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहे.


प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक एनटीईएस, रेलवन ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हे काम पूर्ण झाल्यानंतर भादली–जळगाव दरम्यानच्या पाचव्या रेल्वे मार्गामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढेल, गाड्यांची वक्तशीरता सुधारेल आणि रेल्वे संचालन अधिक सुरक्षित व कार्यक्षम होईल.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा