- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन
मुंबई : महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची खास ओळख असलेल्या दहीहंडी या साहसी खेळाचा आगामी काळात एशियाड, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. वरळी डोम येथे आयोजित 'प्रो-गोविंदा' लीगच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. (CM Devendra Fadnavis)
मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात यावे. ...
वरळी डोम येथे दिमाखात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापौर रितू तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गोविंदा पथके उपस्थित होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोकुळाष्टमीच्या निमित्ताने साजरी होणारी दहीहंडी ही समाजाला एकत्रित करून सामाजिक अभिसरण घडवणारी परंपरा आहे. तरुणांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार देत, खांद्याला खांदा लावून मानवी मनोरे रचत ही हंडी फोडली जाते. यामध्ये जमिनीवर पाय रोखून उभा राहणारा गोविंदा असो किंवा सर्वात वरती चढून हंडी फोडणारा गोविंदा, प्रत्येक स्तरावरील घटकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळामध्ये 'टीम स्पिरिट' आणि संघभावना हीच सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (CM Devendra Fadnavis)
यापूर्वीच राज्य सरकारने दहीहंडीला 'साहसी खेळाचा' दर्जा दिला आहे. आता हा साहसी खेळ जागतिक स्तरावर नेण्यासाठी अखिल भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांची मान्यता मिळवणे गरजेचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या खेळाला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. हा खेळ सामान्य खेळाडू खेळू शकत नाही, यासाठी उत्तम चॅम्पियन्सची गरज असते, असे कौतुकोद्गार काढत त्यांनी सहभागी सर्व गोविंदा पथक आणि प्रशिक्षककांना शुभेच्छा दिल्या. (CM Devendra Fadnavis)