Gungi Gudiya Controversy : 'गुंगी गुडिया'चा वाद चिघळला

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मंत्रालय परिसरात आंदोलन; काँग्रेसने जाहीर माफी मागण्याची मागणी


मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने वापरलेल्या 'गुंगी गुडिया' या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात जोरदार निदर्शने केली. काँग्रेसने या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'गुंगी नाही, वादळ आहे' अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून सोडला.

काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात नाशिक, पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत पोलीस परवानगी नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. कार्यकर्त्यांचा वाढता संताप आणि गर्दी पाहता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार सना मलिक, युवा नेते सुरज चव्हाण, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. काँग्रेसच्या नेत्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मूक आंदोलन करण्याचा आमचा प्रयत्न होता, असे मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही या वक्तव्याचा शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवत असून काँग्रेसने जाहीर माफी मागितल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.



काँग्रेसकडून सोशल मीडियावर दिलगिरी

दरम्यान, काँग्रेसकडून मंगळवारी उशिरा सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त करण्यात आली असली, तरी केवळ दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. राजकीय टीकेची पातळी खालावल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या महिला व युवक आघाडीने राज्यभरात काँग्रेसविरोधात तीव्र निदर्शने सुरूच ठेवली आहेत. या वादामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Add Comment

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून