Jalgaon : जळगाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काळ जवळ आलेल्या एका तरुणाने एकदा मृत्यूला हुलकावणी दिली मात्र त्याच्या एका चुकीने त्याला पुन्हा मृत्यूच्या दाढेत खेचून नेले. मनोज झा (३२, रा. जरंगलोई, जि. सुंदरगड, ओडिशा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. (Jalgaon News)
Nashik Crime News : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी 'डायल 112' ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'डायल 112' च्या मदतीने ...
नेमकं काय घडलं ?
मनोज झा (Manoj Jha) आणि त्याचा भाऊ सुरेन झा (Suren Jha) हे दोन ऑगस्ट रोजी रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जात होते. प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर मनोज पाणी घेण्यासाठी खाली उतरला. यावेळी रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Jalgaon News)
Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या अपघातात भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला ...
...तर कदाचित जीव वाचला असता
मात्र रुग्णालयात त्याची एक चूक त्याला महागात पडली आहे. उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास मनोज हा कोणालाही काही न सांगता रुग्णालयातून निघून गेला. जखमी अवस्थेतील रुग्ण अचानक बेपत्ता झाल्याने काही काळ रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रात्रीच्या वेळी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात तो आढळून आला. १०८ रुग्णवाहिका चालकाने तत्काळ त्याला पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Government Medical College Hospital) दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Jalgaon News)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट युरोप आणि चीनमध्ये अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन आणि ...
पोलिसांकडून तपास सुरु
धक्कादायक म्हणजे या घटनेबाबत त्याच्या सोबत आलेल्या भावाला याची कुठलीही कल्पना नव्हती. अपघातानंतर मनोजसोबत असलेला त्याचा भाऊ सुरेन झा रेल्वेने पुढे नागपूरपर्यंत गेला होता. मात्र, भाऊ सोबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो पुन्हा भुसावळला परतला. आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी शोध घेऊनही मनोजचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याने ही माहिती ओडिशातील (Odisha) नातेवाईकांना कळवली. त्यानंतर नातेवाईक जळगाव (Jalgaon) येथे दाखल झाले. तोपर्यंत मृतदेहाची रुग्णालयात अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृत व्यक्ती मनोज झा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात (Industrial Estate Police Station) अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार ओमप्रकाश सोनी करीत आहेत.