स्मार्टफोन जगतात खळबळ उडवून देण्यासाठी वनप्लसचा आगामी फ्लॅगशिप फोन 'वनप्लस १६' (OnePlus 16) लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे. नुकत्याच झालेल्या 'स्नॅपड्रॅगन गेमिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्स २०२६' मध्ये कंपनीने या फोनच्या लाँचिंगला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, २०१३ मधील 'वनप्लस ११' नंतर प्रथमच या नवीन सिरीजमध्ये ८जीबी रॅम मॉडेलचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे : "लोकप्रतिनिधी हा नगराचा किंवा सत्तेचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून जनतेमध्ये राहा, नागरिकांच्या अडचणी ...
अपेक्षित किंमत आणि स्टोरेज व्हेरिएंट्स:
मिळालेल्या माहितीनुसार, वनप्लस १६ एकूण चार वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये बाजारात येऊ शकतो:
-
८जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज: अंदाजे CNY ४,९९९ (सुमारे ७१,००० रुपये)
-
१२जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज: अंदाजे CNY ५,४९९ (सुमारे ७७,६०० रुपये)
-
१२जीबी रॅम + ५१२जीबी स्टोरेज: अंदाजे CNY ५,९९९ (सुमारे ८४,७०० रुपये)
-
१६जीबी रॅम + १टीबी स्टोरेज (लिमिटेड एडिशन): अंदाजे CNY ७,४९९ (सुमारे १.०५ लाख रुपये)
मात्र, या लीकनुसार कंपनी यावर्षी २४जीबी रॅमचा कोणताही व्हेरिएंट लाँच करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
OnePlus 16 pricing • 8GB+256GB: ¥4,999 (₹70,600/$740) • 12GB+256GB: ¥5,499 (₹77,700/$815 • 12GB+512GB: ¥5,999 (₹84,700/$888) • 16GB+1TB (limited edition): ¥7,499 (₹1,06,00/$1,100) There won't be a 24GB variant pic.twitter.com/sINW13YSrF
— OPlus Club (@OnePlusClub) August 2, 2026
नवी दिल्ली : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, रेल्वेच्या मालकीच्या जमिनी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सॉल्ट पॅन ...
तीन विशेष गेमिंग तंत्रज्ञानासह होणार सादर:
स्नॅपड्रॅगन गेमिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये, वनप्लस चायनाचे जनरल मॅनेजर लिऊ बाओयू यांनी पुष्टी केली आहे की, हा हँडसेट या वर्षाच्या उत्तरार्धात तीन विशेष ‘एक्सक्लुझिव्ह गेमिंग टेक्नॉलॉजी’ सह बाजारात उतरवला जाईल. फोनच्या अधिकृत लाँचिंगची तारीख अद्याप समोर आली नसली, तरी या नवीन लीक्समुळे टेकप्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.






