Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच या योजनेतील पाणीपंपांचा वीज खर्च कमी करण्यासाठी प्रस्तावित १५०० केव्हीए क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून एका महिन्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


या संदर्भात मंत्रालयात मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



पर्यटन आणि नागरिकांसाठी महत्त्वाची योजना :


बैठकीत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास आणि स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नाबार्डच्या माध्यमातून या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागांनी वित्त विभागाच्या समन्वयाने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.



चिपी विमानतळाच्या विस्तारामुळे वाढणार पाण्याची गरज :


मंत्री पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी सांगितले की, वेंगुर्ला-चिपी हा सागरी किनारपट्टीचा भाग असल्याने गोड्या पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पातून पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाकडे ठराव आणि प्रस्ताव सादर केले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार, पर्यटन व्यवसाय आणि औद्योगिक प्रकल्प वाढल्यास पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्याने ही योजना भविष्योन्मुख ठरणार आहे.



सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज खर्चात मोठी बचत :


तिलारी पाणीपुरवठा योजनेतील पाणीपंपांचा वाढता वीज खर्च लक्षात घेऊन १५०० केव्हीए क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चिला गेला. या प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, तो उपलब्ध झाल्यास पाणीपुरवठा योजनेचा दीर्घकालीन वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. (Minister Gulabrao Patil)



७८.४६ कोटींच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरीची प्रतीक्षा :


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्पातून दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांना पाणीपुरवठा करण्याची योजना प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यातील दोडामार्ग ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून, आता वेंगुर्ला ते चिपी विमानतळ या दुसऱ्या टप्प्यासाठी ७८ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने ते नाबार्डच्या माध्यमातून राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.



४० गावांसह चिपी विमानतळाला होणार लाभ :


ही योजना पूर्ण झाल्यानंतर सागरी किनारपट्टीवरील सुमारे ४० महसुली गावे आणि चिपी विमानतळाला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे या भागातील दीर्घकालीन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असून, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, उद्योग आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय पाणीपट्टीच्या माध्यमातून शासनालाही महसूल प्राप्त होणार असल्याने हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या