Tuesday, August 4, 2026

Hemoglobin Foods : शरीरात रक्ताची तीव्र कमतरता? औषधं-गोळ्या विसरा! 'हे' ७ पदार्थ नैसर्गिकरित्या वाढवतील हिमोग्लोबिनचा स्तर

Hemoglobin Foods : शरीरात रक्ताची तीव्र कमतरता? औषधं-गोळ्या विसरा! 'हे' ७ पदार्थ नैसर्गिकरित्या वाढवतील हिमोग्लोबिनचा स्तर
हल्ली अनेकांना सतत थकवा येणे, थोडं काम केल्यावर चक्कर येणे, केस गळणे किंवा अशक्तपणा जाणवण्याची समस्या भेडसावत आहे. ही लक्षणे शरीरातील हिमोग्लोबिन कमी असल्याचे संकेत असू शकतात. हिमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे प्रथिन असून, ते शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे त्याची पातळी योग्य राखणे आवश्यक आहे. (Hemoglobin) पोषणतज्ज्ञांच्या मते, केवळ लोहयुक्त पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढत नाही. त्यासाठी व्हिटॅमिन B12, फोलेट (व्हिटॅमिन B9) आणि व्हिटॅमिन C यांचाही आहारात समावेश असणे गरजेचे आहे. हे पोषक घटक लाल रक्तपेशींची निर्मिती आणि लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त 7 पदार्थ

  • अळिवाच्या बिया – लोहाचा उत्तम स्रोत. रात्री भिजवून सकाळी सेवन केल्यास फायदा होतो.
  • शेवग्याची पाने – लोह आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला लोह शोषण्यास मदत होते.
  • काळे तीळ – लोहासोबत कॉपरही मिळते, जे नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत करते.
  • बाजरी – गव्हाऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्यास लोहाचा पुरवठा होतो.
  • मसूर डाळ – लोह आणि फोलेटचा चांगला स्रोत. लिंबाचा रस घालून खाल्ल्यास अधिक लाभ होतो.
  • राजगिरा – ग्लुटेन-फ्री धान्य असून त्यात लोह मुबलक असते.
  • काळे चणे – लोह आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत. मोड आणून किंवा उकडून खाल्ल्यास अधिक फायदेशीर.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >