Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने याबाबत प्रवाशांना माहिती देत, विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात अनधिकृत प्रवेश, महिलांच्या डब्यात घुसखोरी आणि तिकिटांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात आता अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Central Railway New Rules)


या सुधारणांमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली असून, दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीला थेट न्यायालयात हजर केले जाणार आहे. काही प्रकरणांमध्ये कारावासाची तरतूदही कायम ठेवण्यात आली आहे. (Central Railway New Rules)



विनातिकीट प्रवास महागात पडणार :


रेल्वे कायद्याच्या कलम १३७ अंतर्गत वैध तिकीट किंवा पास नसताना फसवणुकीच्या उद्देशाने प्रवास करणाऱ्यांना आता भाड्यासह अतिरिक्त शुल्क (किमान ५०० रुपये) भरावे लागणार आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाईल. त्यानंतर न्यायालय दोषीला सहा महिन्यांपर्यंत कारावास, ५०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावू शकते. (Central Railway New Rules)



आरक्षित डब्यात प्रवेश केल्यास २ हजारांपर्यंत दंड :


कलम १५५ अंतर्गत आरक्षित डब्यात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर आता २,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच अधिकृत प्रवाशाला डब्यात प्रवेश करण्यास अडथळा आणल्यास १,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. दंड न भरल्यास न्यायालय ३,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते आणि संबंधित व्यक्तीला डब्यातून बाहेर काढण्याचे आदेशही देऊ शकते. (Central Railway New Rules)



महिलांच्या डब्यात घुसल्यास ५ हजारांपर्यंत दंड :


महिलांसाठी राखीव डबा किंवा जागेत अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर आता २,५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. दंड न भरल्यास न्यायालय ५,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. संबंधित व्यक्तीची जागा रिकामी करून पास किंवा तिकीटही जप्त करण्यात येईल. मात्र, या कलमांतर्गत तृतीयपंथी व्यक्तींवर कारवाई केली जाणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Central Railway New Rules)



तिकिटांचा गैरवापर केल्यासही कठोर कारवाई :


कलम १४२ अंतर्गत तिकीट इतरांना हस्तांतरित करणे किंवा अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करणे यावरही कठोर कारवाई होणार आहे. अशा प्रकरणात तिकीट जप्त करून भाड्यासह अतिरिक्त शुल्क (किमान ५०० रुपये) भरावे लागेल. दंड न भरल्यास न्यायालय सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. (Central Railway New Rules)



अधिकृत अंतरापेक्षा पुढे प्रवास केल्यासही वाढीव दंड :


कलम १३८ नुसार तिकीटावरील अधिकृत अंतरापेक्षा पुढे प्रवास केल्यास आता भाड्यातील तफावत आणि अतिरिक्त शुल्क (किमान ५०० रुपये) भरावे लागेल. रक्कम न भरल्यास संबंधित व्यक्तीला न्यायालयासमोर हजर केले जाईल. आवश्यक रक्कम न भरल्यास १० दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. (Central Railway New Rules)



प्रवाशांना मध्य रेल्वेचे आवाहन :


मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना नेहमी वैध तिकीट किंवा पाससह प्रवास करण्याचे, आरक्षित जागांचा आदर करण्याचे, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश टाळण्याचे तसेच रेल्वे परिसरात फेरीवाला व्यवसाय, धूम्रपान आणि इतर बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, या सुधारित नियमांचा उद्देश प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे, गैरप्रकारांना आळा घालणे आणि सर्वांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध बनवणे हा आहे. (Central Railway New Rules)

Comments
Add Comment

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६