Donald Trump : ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफविरोधात 25 अमेरिकन राज्यांचा न्यायालयात धाव; अधिकारांच्या गैरवापराचा आरोप

 Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर लागू केलेल्या नव्या आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाविरोधात 25 अमेरिकन राज्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या राज्यांचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत कायदेशीर अधिकारांशिवाय हे टॅरिफ लागू केले आहेत.


वृत्तसंस्था एएफपीनुसार, बहुतांश डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील या 25 राज्यांनी न्यूयॉर्कस्थित अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नव्या टॅरिफना बेकायदेशीर घोषित करण्याची, त्यांची तात्काळ अंमलबजावणी थांबवण्याची आणि सरकारने वसूल केलेली रक्कम संबंधितांना परत करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.


राज्यांच्या याचिकेनुसार, आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत सक्तीच्या मजुरीचा वापर होत असल्याच्या आरोपांचा आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) लावलेल्या जागतिक टॅरिफचा थेट संबंध सिद्ध होत नाही. त्यामुळे या कारणावरून लावलेले आयात शुल्क कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे.



हे प्रकरण ट्रम्प प्रशासनाने गेल्या महिन्यात सुमारे 60 प्रमुख व्यापार भागीदार देशांवर 10 ते 12.5 टक्क्यांपर्यंत लागू केलेल्या नव्या टॅरिफशी संबंधित आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंवर या शुल्काचा परिणाम होणार आहे. USTR च्या तपासणीनंतर काही देशांमध्ये उत्पादनासाठी सक्तीच्या मजुरीचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या टॅरिफची घोषणा करण्यात आली.


यापूर्वी ट्रम्प यांनी लागू केलेल्या पहिल्या टप्प्यातील टॅरिफना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये रद्द केले होते. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने सर्वसाधारण 10 टक्के आयात शुल्क लागू केले होते. त्याची मुदत जुलैमध्ये संपल्यानंतर 24 जुलैपासून अमेरिकेच्या व्यापार कायद्यातील कलम 301 अंतर्गत नवीन टॅरिफ लागू करण्यात आले आहेत. आता या नव्या निर्णयालाही न्यायालयीन आव्हान मिळाल्याने ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर