OpenAI Astra AI : मानवी मेंदूलाही न जमलेले काम AI ने करून दाखवले! OpenAI च्या 'Astra' मॉडेलने सोडवली १० जुनी कठीण कोडी

वॉशिंग्टन : तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवणाऱ्या OpenAI या प्रसिद्ध कंपनीने एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. कंपनीने 'Astra' (अस्त्रा) नावाचे एक नवीन AI मॉडेल तयार केले असून, या तंत्रज्ञानाने गणित आणि संगणक शास्त्रातील गेली कित्येक वर्षे न सुटलेली १० अत्यंत गुंतागुंतीची कोडी आणि सिद्धांत यशस्वीरीत्या सोडवले आहेत. आतापर्यंत AI चा वापर फक्त वाक्ये लिहिणे किंवा साधी कामे करण्यासाठी होत होता; पण या यशामुळे AI आता थेट मोठ्या वैज्ञानिक संशोधनात माणसाला मदत करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.



माणसाच्या मदतीशिवाय AI ने शोधल्या गणितीय पायऱ्या!


OpenAI ने दिलेल्या माहितीनुसार, या 'Astra' AI मॉडेलने या कठीण कोड्यांची उत्तरे (Mathematical Proofs) पूर्णपणे स्वतःच्या बुद्धिमत्तेने तयार केली आहेत. यात मानवाने कोणतीही थेट मदत केलेली नाही. AI चे हे उत्तर अगदी बरोबर आहे की नाही, हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी 'Lean' नावाच्या एका विशेष संगणकीय प्रणालीचा वापर केला. या प्रणालीद्वारे AI ने मांडलेल्या प्रत्येक पायरीची अतिशय बारकाईने तपासणी करण्यात आली, जेणेकरून त्यात कोणतीही चूक उरणार नाही. हे संशोधन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संगणकीय ताकदीची गरज लागली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका कोड्याचे बरोबर उत्तर शोधण्यासाठी AI च्या कॉम्प्युटिंग पॉवरवर सुमारे २,००० डॉलर्स म्हणजे अंदाजे १ लाख ६५ हजार रुपयांपेक्षा जास्त इतका खर्च आला आहे.



AI ने नक्की कोणत्या प्रकारची उत्तरे शोधली?



  • स्पेअर पॅकिंग (Sphere Packing) आणि त्रुटी सुधारणारे कोड्स: संगणकात डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि डेटा पाठवताना होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी या गणिताचा वापर केला जातो, ज्याला AI ने अधिक सोपे केले आहे.

  • 'Non-Sofic Group' ची निर्मिती: गणित जगतात ज्याची कल्पना करणेही कठीण मानले जायचे, अशा अत्यंत गुंतागुंतीच्या रचनेचे (Infinite Symmetries) मॉडेल AI ने पहिल्यांदाच तयार केले आहे.

  • क्वांटम तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध सिद्धांत: गणितातील प्रसिद्ध 'एहरहार्ट' (Ehrhart) आणि 'कॉनस' (Connes) या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या जुन्या सिद्धांतांवर AI ने नवीन आणि अचूक निष्कर्ष शोधून काढले आहेत.


विज्ञानाच्या क्षेत्रात AI चे वाढते पाऊल


गणित क्षेत्रात OpenAI ने असा शोध लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीच, पॉल एर्डॉस या महान गणितज्ञांनी ८० वर्षांपूर्वी विचारलेल्या एका कठीण प्रश्नावर AI ने नवीन उत्तर शोधले होते, ज्याला जगातील मोठ्या गणितज्ञांनी नंतर मान्यता दिली होती. Astra ने शोधलेल्या या नवीन १० उत्तरांचीही आता जगातील मोठे वैज्ञानिक आणि गणितज्ञ सखोल तपासणी (Peer Review) करतील. ही तपासणी पूर्ण झाल्यावर या शोधावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. मात्र, आजवर मानवी मेंदूला जे प्रश्न सोडवणे अशक्य वाटत होते, ते प्रश्न आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सहज सोडवू लागली आहे, हे या घटनेने सिद्ध केले आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)