Supreme Court : विद्यार्थी आंदोलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलं स्पष्टीकरण, राज्यांना फौजदारी खटले मागे घेण्याचे स्वातंत्र्य

नवी दिल्ली : दिल्लीत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील निवडक राज्यांमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी पोलिसांवर हल्ला होणे, सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे असे प्रकार घडले. यामुळे ठिकठिकाणी हिंसा करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना उद्देशून स्पष्ट निर्देश दिले आहेत.



ज्या राज्यात विद्यार्थ्यांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे त्या राज्याचे सरकार त्यांच्या अधिकारात कोणता गुन्हा मागे घ्यावा आणि कोणता कायम ठेवावा याचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ते असे निर्णय घेऊ शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या खुलाश्यानंतर राज्य सरकारे कायद्यानुसार फौजदारी खटले बंद करण्यास किंवा मागे घेण्यास स्वतंत्र आहेत. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशातील 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' हा शब्दप्रयोग केवळ गंभीर आणि घृणास्पद गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होतो.



याआधी २८ जुलै २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या पण आंदोलन करतेवेळी पकडण्यात आलेल्यांना विद्यार्थ्यांना सोडून देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने आंदोलनावेळी पोलिसांनी केलेले आरोप आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांवर केलेले आरोप यांच्यातील सत्यतेची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमणार असल्याचे सूतोवाच केले आहे. या समितीत फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानेच सदस्य नियुक्त होणार आहेत. तसेच ही समिती थेट सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित काम करणार आहे.



कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पॅलेट गन वापरू शकतात. पण त्यासाठी निश्चित अशी कार्यप्रणाली तयार करावी आणि त्याची माहिती द्यावी; असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्यांच्या गृहमंत्रालयाला दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)