Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करत त्यांची आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाचा निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला.


निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी सांगितले की, आरोप झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आपण निर्दोष असल्याचे सांगत होतो. "जर माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला असता, तर मी स्वतःला फाशी दिली असती. आज न्यायालयाने मला सन्मानाने निर्दोष मुक्त केले आहे. हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी आनंदाचा आहे," असे त्यांनी म्हटले.



या प्रकरणात 2016 ते 2019 या कालावधीत भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय, अधिकृत निवासस्थान आणि परदेश दौऱ्यांदरम्यान काही महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले होते. 2023 मध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.


दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात WFI चे तत्कालीन निलंबित सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांनाही पुराव्याअभावी दोषमुक्त केले. (Sexual Harrasment Case)



या प्रकरणात एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून 'पॉक्सो' कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित तक्रार नंतर मागे घेण्यात आल्याने ते प्रकरण बंद करण्यात आले. उर्वरित प्रकरणात पोलिसांनी IPC कलम 354, 354A आणि 354D अंतर्गत आरोप ठेवले होते. (Vinod Tomar)


दरम्यान, या आरोपांमुळे बृजभूषण शरण सिंह यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांच्या जागी भाजपने त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आले. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह पुन्हा सक्रिय राजकारणात किंवा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Delhi Court)

Comments
Add Comment

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात