मुंबई :
महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या संदर्भातले आदेश सोमवार ३ ऑगस्ट रोजी निर्गमित झाले असून अधिकारी वर्गाने त्याबद्दल माननीय पीठासीन अधिकारी तसेच सचिव यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.
Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार
- नितेश राणे यांच्यासारखे काम राज्यातील कोणत्याही ...
पदोन्नती प्राप्त झालेल्या १८ अधिकाऱ्यांची नावे आणि पदोन्नतीचे पद
पदोन्नतीनुसार उपसचिव पदाकरिता सीमा तांबे, पुष्पा दळवी आणि घननीळ देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव पदाकरिता विनोद राठोड, कैलास पाझारे, जयश्री म्हात्रे , जीवन गावकर, पवन म्हात्रे आणि नेहा कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. अवर सचिव (समिती) पदासाठी नितीन अहेर, रविंद्र मेस्त्री आणि अलका पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कक्ष अधिकारी पदावर जान्हवी गमरे, दिनेश तरे, संतोष सुद्रिक, ज्योती कामतेकर, शुभांगी जगे आणि शितल मोरे यांची निवड करण्यात आली आहे. पदोन्नतीचे आदेश विधान मंडळ सचिवालय, आस्थापना विभाग यांच्या मार्फत जारी करण्यात आले. पीठासीन अधिकारी यांच्या सचिवांनी ही प्रक्रिया जलद गतीने पूर्णत्वास नेली.