नवी दिल्ली : भारताने जुलै महिन्यात रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात करत ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जुलैमध्ये भारताने दररोज सुमारे २८ लाख बॅरल कच्चे तेल रशियाकडून आयात केले असून, देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा ५५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचबरोबर एलपीजी (LPG) आयातीसाठी भारताचे अमेरिकेवरील अवलंबित्वही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. (Crude Oil Import)
रशिया ठरला भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार :
शिप-ट्रॅकिंग संस्था Kpler च्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये भारताने रशियाकडून दररोज २७ लाख बॅरल कच्चे तेल आयात केले होते. जुलैमध्ये हा आकडा वाढून २८ लाख बॅरल प्रतिदिन झाला. त्यामुळे भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा निम्म्याहून अधिक झाला आहे. युक्रेन युद्धानंतर रशियाने सवलतीच्या दरात कच्चे तेल उपलब्ध करून दिल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवली आहे. (Crude Oil Import)
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि अटक करण्यात आलेल्या ...
खाडी देशांकडूनही वाढली खरेदी :
जुलै महिन्यात भारताने सौदी अरेबिया, इराक आणि कुवैतकडूनही कच्च्या तेलाची आयात वाढवली. सौदी अरेबियाकडून आयात २.९ लाख बॅरलवरून ४.२ लाख बॅरल प्रतिदिन झाली, तर इराककडून पुरवठा जवळपास दुपटीने वाढून १.३ लाख बॅरल प्रतिदिन झाला. कुवैतकडूनही पुन्हा तेलपुरवठा सुरू झाला आहे. दुसरीकडे, यूएईकडून आयात मात्र ५.१ लाख बॅरलवरून ४.६ लाख बॅरल प्रतिदिन इतकी कमी झाली. तरीही यूएई भारतासाठी दुसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे. (Crude Oil Import)
LPG साठी अमेरिकेवर वाढले अवलंबित्व :
जुलै महिन्यात भारताने १२ लाख टनांहून अधिक एलपीजीची आयात केली. यापैकी सुमारे ९ लाख टन म्हणजेच ७३ टक्के एलपीजी अमेरिकेतून आयात करण्यात आली. त्यामुळे एलपीजीच्या बाबतीत भारताचे अमेरिकेवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. (Crude Oil Import)
नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा आपल्या एका ...
रशियन तेल अधिक विश्वासार्ह का ठरत आहे?
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनी आणि बाब-अल-मंदेब परिसरातील वाढत्या तणावामुळे जागतिक तेलवाहतुकीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून कच्च्या तेलाचा नियमित पुरवठा सुरू असल्याने भारतीय कंपन्यांनी त्याला प्राधान्य दिले आहे. याशिवाय, रशियातील रिफायनरींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे देशांतर्गत शुद्धीकरण कमी झाले असून निर्यातीसाठी अधिक कच्चे तेल उपलब्ध झाले आहे. त्यामुळे भारताला रशियाकडून सातत्याने तेलपुरवठा मिळत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. (Crude Oil Import)
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण :
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर सुमारे ५ टक्क्यांनी घसरून ८३.५३ डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. यामुळे भारताच्या आयात खर्चावर काहीसा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Crude Oil Import)