Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो चर्चेत आहे घटलेल्या वजनामुळे. सलमान खानच्या वजनात लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे सलमानला काही गंभीर आजार आहे का ? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे. पण या चर्चेला पूर्णविराम देणारी घटना नुकतीच घडली आहे. या ताज्या घटनेमुळे सलमान खानच्या वजनात मोठी घट होण्यामागचं सत्य समोर आलं आहे.



सलमान खान 'अलायन्स' या 'रिअॅलिटी शो'च्या सेटवर गेला होता. तिथे त्याने भाऊ सोहेल खानची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोहेल खानने शर्ट वर करून सलमानला आपले घटलेले वजन दाखवले. किमान १२ किलो वजन घटल्याचे सोहेलने सलमान सांगितले. यानंतर सलमान खानने १६ किलो वजन घटवल्याचे सांगितले. सलमानने स्वतःच ही माहिती दिल्यामुळे तो आजारी नाही तर एका नव्या प्रोजेक्टसाठी फिटनेस जपत असल्याचे सर्वांना समजले.



सलमानचा बहुचर्चित सिनेमा मातृभूमी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच किक २ सिनेमावरही काम सुरू आहे. इतर पण काही प्रोजेक्ट आहेत ज्यांच्यासाठी सलमानने फिटनेस जपण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. याआधी सलमान खानच्या वजनात मोठी घट झाल्याचे पाहून काही जणांनी त्याला गंभीर आजार झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. पण आता सत्य समोर आलं आहे. सलमानने आगामी प्रोजेक्टसाठी फिटनेसवर भर दिल्यामुळे त्याच्या वजनात घट झाली आहे.




Comments
Add Comment

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या