Actress Devolina Bhattacharjee : "माझ्या आईला वाचवा..."; आसामच्या पुरात अडकलेल्या कुटुंबाबद्दल बोलताना गोपी बहू भावूक

मुंबई : आसाममधील भीषण पुरामुळे (Assam floods) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लाखो नागरिक या नैसर्गिक आपत्तीने प्रभावित झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून हजारो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. या पुराचा फटका आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिच्या कुटुंबालाही बसला आहे. 'साथ निभाना साथिया' मालिकेत 'गोपी बहू'ची (Gopi Bahu) भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या देवोलिनाने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली. (Actress Devoleena Bhattacharjee)


व्हिडीओमध्ये बोलताना देवोलिनाला अश्रू अनावर झाले. तिने सांगितले की, तिची आई अजूनही आसाममधील नाझिरा येथे पुरात अडकली आहे. तसेच तिच्या आजी आणि मावशीचे घर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून अनेक वर्षांच्या आठवणी आणि कष्टाने उभारलेला संसार एका क्षणात वाहून गेला आहे.



"जर मी याआधी याबद्दल बोलले असते, तर माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नसते. म्हणूनच इतके दिवस व्हिडीओ केला नाही. मला माहीत होतं की मी रडेन," असे सांगताना देवोलिना भावूक झाली. (Actress Devoleena Bhattacharjee)


ती पुढे म्हणाली, "शिवसागर आणि नाझिरा ही माझ्या आयुष्याशी जोडलेली ठिकाणं आहेत. माझा जन्म, शिक्षण आणि बालपण तिथेच गेलं. देवाच्या कृपेने आमचं जुनं घर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं नाही. मात्र आजूबाजूच्या परिसराचं प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या आजीचं आणि मावशीचं घर पूर्णपणे बुडालं असून सर्वकाही नष्ट झालं आहे." (Actress Devoleena Bhattacharjee)


आसाममधील (Assam floods) भीषण परिस्थितीचे वर्णन करताना देवोलिनाने पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहनही केले. "लोकांनी आयुष्यभर कष्ट करून उभारलेला संसार आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी एका क्षणात वाहून गेल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा. छोटीशी मदतही एखाद्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकते," असे ती म्हणाली. (Actress Devoleena Bhattacharjee)



देवोलिनाचा हा भावनिक व्हिडीओ (Emotional Video Viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चाहते आणि नेटकऱ्यांनी तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. (Actress Devoleena Bhattacharjee)

Comments
Add Comment

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या