Sunday, August 2, 2026

Bollywood News : 'सुल्तान'मधून सलमान खानने रिजेक्ट केलेली अभिनेत्री आज गाजवतेय बॉलीवूड; जाणून घ्या त्या अभिनेत्रीच्या संघर्षाबद्दल

Bollywood News : 'सुल्तान'मधून सलमान खानने रिजेक्ट केलेली अभिनेत्री आज गाजवतेय बॉलीवूड; जाणून घ्या त्या अभिनेत्रीच्या संघर्षाबद्दल

मुंबई : कोणत्याही फिल्मी पार्श्वभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री मृणाल ठाकूरचा (Actress Mrunal Thakur) प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. आज हिंदी चित्रपटसृष्टीसह वेब सिरीजमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मृणालला एकेकाळी सलमान खानच्या (Salman Khan) 'सुल्तान' चित्रपटातून नकार मिळाला होता. हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Bollywood News)

मृणाल ठाकूरचे (Actress Mrunal Thakur) वडील उदयसिंह ठाकूर बँकेत नोकरी करत होते, तर आई वंदना ठाकूर गृहिणी आहेत. तिची बहीण लोचन ठाकूर मेकअप आर्टिस्ट असून भाऊ धवल ठाकूर इंजिनिअर आणि अभिनेता आहे. कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीत नसतानाही मृणालने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. (Bollywood News)

डॉक्टर नव्हे, पत्रकार होण्याचं होतं स्वप्न : 

एका मुलाखतीत मृणालने (Actress Mrunal Thakur) सांगितले होते की, तिच्या पालकांची इच्छा तिने दंतवैद्य (डेंटिस्ट) व्हावे अशी होती. मात्र तिला डॉक्टर नव्हे तर पत्रकार बनायचे होते. यासाठी तिने मुंबईतील एका महाविद्यालयात मीडिया अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. शिक्षण सुरू असतानाच 2012 मध्ये तिने एका मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेत मीडिया अभ्यासक्रम अर्धवट सोडला. (Bollywood News)

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास :

मृणालला (Actress Mrunal Thakur) पहिला मोठा ब्रेक 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियां' या मालिकेतून मिळाला. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम करत अभिनयाची छाप पाडली आणि पुढे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. (Bollywood News)

'सुल्तान'मधून का मिळाला नकार?

मृणालला (Actress Mrunal Thakur)सलमान खानच्या 'सुल्तान' (Sultan) चित्रपटासाठी सुरुवातीला विचारण्यात आले होते. हा खुलासा स्वतः सलमान खानने 'बिग बॉस' कार्यक्रमात केला होता. सलमानच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शक अली अब्बास जफर एकदा मृणालला घेऊन त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर आले होते. त्यावेळी मृणालची शरीरयष्टी खूपच सडपातळ असल्याने पैलवानाच्या भूमिकेसाठी ती योग्य वाटली नाही. त्यामुळे तिची निवड करण्यात आली नाही आणि पुढे ही भूमिका अनुष्का शर्मा हिने साकारली. (Bollywood News)

आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर मृणाल ठाकूरने (Actress Mrunal Thakur) बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले असून ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिचा संघर्ष आणि जिद्द अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (Bollywood News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा