Commonwealth Games 2026 : भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला, पण जिद्द सोडली नाही; बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता ठरलेला सोमन राणा

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धेचा शनिवारचा दिवस भारतासाठी अत्यंत सुवर्णमय ठरला. बॉक्सिंगमध्ये भारताने नेत्रदीपक सुवर्णयश मिळवले असतानाच, पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारतीय लष्कराचे हवालदार सोमन राणा यांनी इतिहास रचला आहे. पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात चमकदार कामगिरी करत सोमन राणाने सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे, तर याच स्पर्धेत शुभम जुयालने १३.२८ मीटरच्या थ्रोसह रौप्यपदक पटकावून भारतासाठी ऐतिहासिक दुहेरी विजय नोंदवला. सोमन राणाने १३.४० मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. या दोन्ही खेळाडूंसाठी हे थ्रो त्यांच्या या हंगामातील सर्वोत्कृष्ट ठरले. विशेष म्हणजे, शॉटपुट F57 ही अशी स्पर्धा आहे, ज्यामध्ये खेळाडू पट्ट्याने बांधलेले असतात आणि त्यांना केवळ शरीराच्या वरच्या भागाच्या व धडाच्या ताकदीचा वापर करावा लागतो. पुरुषांच्या F57 शॉटपुट स्पर्धेचे पदार्पण २०२६ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतच झाले आहे.



राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर ते गोळाफेकीचा विजेता


सोमन राणा यांचा हा प्रवास विलक्षण संघर्षाने आणि अफाट जिद्दीने भरलेला आहे. २००१ मध्ये गोरखा रायफल्समध्ये सैनिक म्हणून दाखल झालेल्या सोमन यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात बॉक्सिंगमधून केली होती. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या वतीने २००५ च्या वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या मिडलवेट विभागात सहभाग घेतला होता. एसएससीबी हा भारतीय बॉक्सिंगमधील सर्वात बलाढ्य देशांतर्गत संघांपैकी एक मानला जातो.



मात्र, या स्पर्धेतून पदक न मिळवता परतल्यानंतर ते आपल्या युनिटमध्ये (८ व्या गोरखा रायफल्सची दुसरी बटालियन) परतले. दुर्दैवाने, नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना काश्मीरमधील एका शोध मोहिमेदरम्यान त्यांचा पाय भूसुरुंगावर पडला आणि या भीषण स्फोटात त्यांना आपला उजवा पाय गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.



अपघातानंतरचे पुनरागमन आणि नवाध्याय


दुखापतीतून बरे झाल्यानंतर राणा पुण्यातील लष्करी पुनर्वसन केंद्रात गेले, जिथे त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. सैन्यात असताना राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळलेले सोमन यांनी प्रशासकीय कर्तव्य बजावल्यानंतर, लष्कराच्या पॅरालिम्पिक केंद्रावर गोळाफेकीमध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. बॉक्सिंगमधील त्यांचा अनुभव गोळाफेकीत कामी आला. "राईट क्रॉस आणि गोळाफेक यात फारसा फरक नाही. माझा राईट हुक आणि राईट क्रॉस शक्तिशाली होता, ज्यामुळे गोळाफेकीशी जुळवून घेणे मला सोपे गेले," असे त्यांनी स्पष्ट केले.


एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या सोमन राणाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० आणि पॅरालिम्पिक्स २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता ग्लासगो २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शॉटपुट F57 मध्ये सुवर्णपदक जिंकत त्यांनी आपल्या या खडतर प्रवासाला एका सुवर्णपेरणीने समृद्ध केले आहे. त्यांच्या या अद्भूत यशाने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Comments
Add Comment

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर