India-China Border : नाथुला खिंडीतून ६ वर्षांनंतर भारत-चीन सीमा व्यापार पुन्हा सुरू

सिक्किम : कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या सीमा तणावामुळे २०२० पासून बंद असलेला भारत-चीन सीमा व्यापार तब्बल ६ वर्षांच्या खंडानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृतपणे पुन्हा सुरू झाला आहे. सिक्किमचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री टी. टी. भुटिया यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांच्या आर्थिक जीवनाला आणि उपजीविकेला मोठा आधार मिळेल, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी सिक्किममधून कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



सिक्किमची हस्तकला, हातमाग आणि सेंद्रिय उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. या व्यापारामुळे स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. सध्याच्या ३६ व्यापारी वस्तूंच्या यादीत सुधारणा करून घोडे, शेळ्या यांसारख्या पारंपरिक वस्तूंएवजी औद्योगिक उत्पादनांचा समावेश करावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.




दैनिक व्यापार मयदित वाढ


सध्याची दररोजच्या २ लाख रुपयांपर्यंतची व्यापारी मर्यादा बदलून, आजच्या चलन मूल्याच्या निकषानुसार ती वाढवण्यात यावी, असा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या व्यापारासाठी सुमारे ५०० व्यापाऱ्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी ३०० जणांची कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण झाली आहे. सर्व व्यापाऱ्याऱ्यांना लवकरच पास मिळून पुढील दोन आठवड्यांत हा व्यापार पूर्ण गती पकडेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. समुद्रसपाटीपासून १४,००० फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेली नाथुला खिंड हा भारत आणि चीनमधील ऐतिहासिक रेशीम मार्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दोन्ही देशांच्या बरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हा व्यापार पुन्हा सुरू केला.

Comments
Add Comment

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

26/11 Mumbai Attack Hafiz Saeed : हाफिज सईदसह ६ पाकिस्तानी आरोपींवर भारतात ‘इन-अबसेंटिया’ खटला; कायदेशीर प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : २००८ च्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला जवळपास १८ वर्षे उलटून गेल्यानंतर भारताने या

Jantar Mantar Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी; सुप्रीम कोर्टाकडून ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

नवी दिल्ली : जंतरमंतरसह देशातील विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण

Viral News : नवरी नटून-थटून मंडपात उभी होती, अचानक घडला असा प्रकार अन् थेट डॉक्टर बनून उपचारासाठी धावली

केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले

Bihar Accident : क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं! वाढदिवसाच्या कार्यक्रमात बस काळ बनून आली; बिहारमध्ये भयानक अपघात घडला

बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात