Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या कसोटीत ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) नव्या चेंडूने बांगलादेशच्या फलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. (Aus vs Ban 2nd Test Match)


स्टार्कने (Mitchell Starc) अवघ्या २२ चेंडूत बांगलादेशच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या स्विंग आणि सीमसमोर बांगलादेशचा फलंदाजी क्रम अक्षरशः कोलमडला.



पहिल्याच चेंडूवर विकेट :


मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शादमन इस्लामला बाद करत ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात करून दिली. चेंडू उशिरा स्विंग झाला आणि शादमनच्या बॅटची कड घेत तो कॅमेरून ग्रीनच्या हातात विसावला. कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची स्टार्कची ही चौथी वेळ ठरली.



यानंतर स्टार्कने (Mitchell Starc) दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तन्झीद हसन तमीमला बाद केले. त्यानंतरच्या चेंडूवर नजमुल हुसैन शांतोला एलबीडब्ल्यू करत त्याने बांगलादेशला तिसरा धक्का दिला. सुरुवातीच्या अवघ्या १४ चेंडूंमध्ये बांगलादेशचे तीन फलंदाज माघारी परतले. (Aus vs Ban 2nd Test Match)



७ षटकांत १२ धावांत ५ विकेट्स :


स्टार्क (Mitchell Starc) इथेच थांबला नाही. आपल्या पुढील स्पेलमध्ये त्याने मोमिनुल हक आणि लिटन दास यांनाही बाद केले. अशाप्रकारे त्याने अवघ्या २४ चेंडूंच्या पहिल्या स्पेलमध्ये बांगलादेशच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बांगलादेशने अवघ्या ७ षटकांत १२ धावांवर पाच विकेट्स गमावल्या. स्टार्कच्या घातक गोलंदाजीमुळे बांगलादेशच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला. (Aus vs Ban 2nd Test Match)



डेल स्टेनला टाकलं मागे :


या पाच विकेट्ससह मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकले.


डेल स्टेनने ९३ कसोटी सामन्यांच्या १७१ डावांमध्ये ४३९ विकेट्स घेतल्या होत्या. स्टार्कने (Mitchell Starc) आपल्या १०७व्या कसोटी सामन्यात २०५ डावांमध्ये ४४० विकेट्सचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी ८०० विकेट्स घेतल्या आहेत. तर वेगवान गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसन यांच्या नावावर ७०४ विकेट्स आहेत. (Aus vs Ban 2nd Test Match)

Comments
Add Comment

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज