Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार


खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप


खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार; बारामतीत ऑक्टोबरमध्ये कै. भाई नेरुरकर चषक स्पर्धा



पुणे : बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वितरण उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.





या कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त जनार्दन शेळके, अर्जून पुरस्कार प्राप्त सुरेखा कुलकर्णी, श्रीरंग इनामदार उपस्थित होते. बदलत्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज बनली असून लॅपटॉपमुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. स्वर्गीय अजितदादांनी खो खो खेळाच्या चौफेर प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरण होत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.





कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची व प्रतिष्ठित खो-खो स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा बारामती येथे होणार असून स्पर्धेच्या अनुषंगाने असोसिएशनने तयारीला सुरुवात करावी,असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव,धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.

Comments
Add Comment

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.