नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण पायाभूत ढाचा नष्ट करावा, त्यानंतरच भारत कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेचा विचार करेल, असा स्पष्ट आणि कठोर संदेश अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी दिला आहे. (India Envoy Warns Pakistan)
सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आयोजित केलेल्या परिषदेनंतर अमेरिकन मासिकात लिहिलेल्या लेखातून क्वात्रा यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. (India Envoy Warns Pakistan)
पुणे : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस म्हणाले. ते पुण्यात देवाभाऊ ...
'भारताने सद्भावनेतून करार केला, पण पाकिस्तान बदलला नाही' :
लेखात क्वात्रा यांनी नमूद केले की, भारताने सिंधू जलवाटप करार हा शेजारी देशाशी मैत्रीपूर्ण संबंध आणि सद्भावनेच्या भावनेतून केला होता. मात्र, गेल्या अनेक दशकांत पाकिस्तानच्या वर्तनात कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही. उलट, दहशतवादाला आश्रय देण्याची त्यांची भूमिका कायम राहिल्याचा आरोप त्यांनी केला. (India Envoy Warns Pakistan)
'युद्धाच्या धमक्या देण्याऐवजी स्वतःच्या समस्या सोडवा' :
सिंधू कराराबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास भारताला युद्धाची धमकी देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. पाकिस्तान आपल्या अंतर्गत अपयशांवर पडदा टाकण्यासाठी भारताविरोधात वातावरण निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले. "परिषदा घेऊन भारतावर आरोप करण्यापेक्षा पाकिस्तानने स्वतःची पाणी व्यवस्थापन व्यवस्था सुधारावी. प्रत्येक अंतर्गत समस्येसाठी भारताला दोष देणे ही इस्लामाबादची जुनी सवय झाली आहे," असे क्वात्रा यांनी स्पष्टपणे नमूद केले. (India Envoy Warns Pakistan)
नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, जर एखादा ...
दहशतवाद संपल्याशिवाय चर्चा नाही :
भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट करताना क्वात्रा म्हणाले की, पाकिस्तानने अनेक वर्षांत उभारलेले दहशतवादी नेटवर्क पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय कोणत्याही द्विपक्षीय चर्चेला अर्थ नाही. भारताचा हा ठाम आणि स्पष्ट संदेश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवाद आणि संवाद हे एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत, त्यामुळे पाकिस्तानने प्रथम दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. (India Envoy Warns Pakistan)





