Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२६ स्पर्धेत भारतानं १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदकं जिंकत पदक तालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. भारतीय वेळेनुसार सोमवार ३ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजून ३० मिनिटांनी स्कॉटलँडच्या OVO हायड्रो एरिना येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२६ स्पर्धेच्या समारोपाचा सोहळा सुरू होणार आहे. या सोहळ्यात अहमदाबादमध्ये कॉमनवेल्थ गेम्स २०३० होणार असल्याचे जाहीर केले जाईल. समारोप सोहळ्यात भारतीय कलाकार निवडक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.



राष्ट्रकुल २०२६ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स २०२६ स्पर्धा २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत झाली. यंदाच्या स्पर्धेत भारतानं चमकदार कामगिरी केली. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स, ज्युडो आणि पॉवरलिफ्टिंग अशा विविध खेळांमध्ये भारताच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. आता यजमान ग्लासगो भावी यजमान असलेल्या अहमदाबादकडे पुढील कॉमनवेल्थ गेम्सची जबाबदारी सोपवेल. या निमित्ताने समारोप सोहळ्यात शंकर महादेवन संगीताच्या जादूनं उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील. राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय कलाकार २० मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. शंकर महादेवन यांच्या व्यतिरिक्त, मानुषी चिल्लर यांचे 'वंदे मातरम' हे गीत आणि ऋषभ ऋखीराम शर्मा व रॉस आइन्स्ली यांचे द्वंद्वगीत देखील सादर होणार आहे. 'अलाइव्ह अँड किकिंग', 'वॉटरफ्रंट', 'प्रॉमिस्ड यू अ मिरॅकल' आणि 'बेलफास्ट चाईल्ड' यांसारख्या हिट गाण्यांसाठी ओळखला जाणारा स्कॉटिश रॉक बँडचा 'सिंपल माइंड्स' या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. भारतीय कलाकारांच्या आधी समारोप समारंभात हा कार्यक्रम सादर होणार आहे. बेन्झ, कॅमी बार्न्स आणि सँडी थॉम हे देखील सादरीकरण करतील. ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेम तिसऱ्यांदा राष्ट्रकुल खेळांच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. 'नेबर्स' या मालिकेतील ही माजी अभिनेत्री मेलबर्न २००६ आणि गोल्ड कोस्ट २०१८ च्या उद्घाटन सोहळ्यांनाही उपस्थित होती.




भारतानं जिंकली १३ सुवर्ण


1. मीराबाई चानू – महिला ४८ किलो – बॉक्सिंग


2. शर्मिला धनकर – महिला गोळाफेक F57 – पॅरा ॲथलेटिक्स


3. दिलीप गावित – पुरुष १०० मीटर T47 – पॅरा ॲथलेटिक्स


4. अस्मिता डे – महिला ४८ किलो – ज्युडो


5. हर्ष सिंग – पुरुष ६० किलो – ज्युडो


6. प्रीती पवार – महिला ५४ किलो – बॉक्सिंग


7. जास्मिन लॅम्बोरिया – महिला ५७ किलो – बॉक्सिंग


8. सोमन राणा – पुरुष गोळाफेक F57 – पॅरा ॲथलेटिक्स


9. साक्षी चौधरी – महिला ५१ किलो – बॉक्सिंग


10. प्रिया घंघास – महिला ६० किलो – बॉक्सिंग


11. अरुंधती चौधरी – महिला ७० किलो – बॉक्सिंग


12. सचिन सिवाच – पुरुष ६० किलो – बॉक्सिंग


13. अंकुश पांघल – पुरुष ८० किलो – बॉक्सिंग



भारतानं पटकावली १७ रौप्य


1. ऋषिकांत सिंग – पुरुष ६० किलो – वेटलिफ्टिंग


2. मुथुपांडी राजा – पुरुष ६५ किलो – वेटलिफ्टिंग


3. ज्ञानेश्वरी यादव – महिला ५३ किलो – वेटलिफ्टिंग


4. सर्वेश कुशारे – पुरुष उंच उडी – ॲथलेटिक्स


5. वल्लुरी अजय बाबू – पुरुष ७९ किलो – वेटलिफ्टिंग


6. हरजिंदर कौर – महिला ६९ किलो – वेटलिफ्टिंग


7. गुलवीर सिंग – पुरुष १० हजार मीटर – ॲथलेटिक्स


8. मुरली श्रीशंकर – पुरुष लांब उडी – ॲथलेटिक्स


9. मोहम्मद बासिल – पुरुष १०० मीटर T47 – पॅरा ॲथलेटिक्स


10. लवप्रीत सिंग – पुरुष +११० किलो – वेटलिफ्टिंग


11. यामिनी मौर्य – महिला ५७ किलो – ज्युडो


12. नीरज चोप्रा – पुरुष भालाफेक – ॲथलेटिक्स


13. प्रवरीन चित्रवेल – पुरुष तिहेरी उडी – ॲथलेटिक्स


14. जादुमणी सिंग – पुरुष ५५ किलो – बॉक्सिंग


15. शुभम जुयाल – पुरुष गोळाफेक F57 – पॅरा ॲथलेटिक्स


16. लव्हलिना बोर्गोहेन – महिला ७५ किलो – बॉक्सिंग


17. नरेंद्र बेरवाल – पुरुष +९० किलो – बॉक्सिंग



भारतानं मिळवली ९ कांस्य


1. झंडू कुमार – पुरुष हेवीवेट – पॅरा पॉवरलिफ्टिंग


2. बिंद्याराणी देवी – महिला ५८ किलो – वेटलिफ्टिंग


3. शिल्पा के शायला – महिला गोळाफेक F57 – पॅरा ॲथलेटिक्स


4. सीमा कालीरामन – महिला डिस्क थ्रो – ॲथलेटिक्स


5. तेजस्विन शंकर – पुरुष डेकॅथलॉन – ॲथलेटिक्स


6. यश वीर सिंग – पुरुष भालाफेक – ॲथलेटिक्स


7. सेल्व प्रभू – पुरुष तिहेरी उडी – ॲथलेटिक्स


8. उन्नती शर्मा – महिला ६३ किलो – ज्युडो


9. गुलवीर सिंग – पुरुष ५ हजार मीटर – ॲथलेटिक्स

Comments
Add Comment

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)