Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या भालाफेकपटूंनी शानदार कामगिरी करत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात दोन पदके जिंकली. शुक्रवारी ...
हर्ष सिंग हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या ज्युडो प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झचा एकतर्फी 10-0 अशा फरकाने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत हर्षने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय ज्युडोला नवी ओळख मिळाली आहे. ( Commonwealth Games 2026)
दिल्लीचा रहिवासी असलेला हर्ष सिंग गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. (Bronze Meddal)
नागपूर: महाराष्ट्राच्या नागपूर शहरातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये १७ वर्षीय होतकरू महिला क्रिकेटपटूने ...
महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता डे हिनेही शानदार खेळ करत कांस्यपदक जिंकले. पदकाच्या लढतीत तिने कॅनडाच्या हेडी क्वाचचा 2-1 असा पराभव केला. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अस्मिताने संयम आणि उत्कृष्ट तंत्राचा वापर करत विजय मिळवला.
अस्मिता डेच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा संघर्ष आहे. तिचे वडील अर्जुन कुमार डे यांचे सायकल दुरुस्तीचे छोटे दुकान असून मर्यादित उत्पन्नात त्यांनी मुलांच्या शिक्षणासह क्रीडा प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठिंबा दिला. आज अस्मिताच्या या यशामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे. (CWG 2026)




