Rat flees : दहा लाखांचा हिरा घेऊन उंदीर फरार; व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्नाटक :कर्नाटकातील तुमकुरू येथे घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका दागिन्याच्या दुकानातून तब्बल १० लाख रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने अचानक गायब झाले. सुरुवातीला दुकानमालकाला चोरीचा संशय आला, मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून सर्वजण अवाक् झाले. कारण हा 'चोर' कोणताही माणूस नसून एक उंदीर होता.ही घटना तुमकुरू शहरातील कॅलटेक्स सर्कलजवळील विश्वास ज्वेलर्स या दुकानात घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी दुकानात आले असता सुमारे ५० ग्रॅम वजनाचे हिरेजडित आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये हिऱ्यांच्या अंगठ्या, सोन्याचे नेकलेस आणि इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश होता. या दागिन्यांची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.दुकानाचे शटर पूर्णपणे सुरक्षित होते. जबरदस्तीने प्रवेश केल्याचे किंवा चोरीचे कोणतेही संकेत दिसत नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला.






 

 


सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दृश्य दिसले, ते पाहून सर्वजण थक्क झाले. एका उंदराने आपल्या तोंडात हिऱ्यांच्या अंगठ्या आणि सोन्याचे दागिने धरून एकामागोमाग एक दुकानाच्या एका कोपऱ्यात ओढत नेल्याचे स्पष्ट दिसत होते.फुटेजच्या आधारे कर्मचाऱ्यांनी उंदराचा मार्ग शोधला. तपासादरम्यान त्यांना दुकानातील एका कोपऱ्यात उंदराचे बिळ सापडले. काळजीपूर्वक खोदकाम केल्यानंतर त्या बिळातून गायब झालेले १० हिऱ्यांच्या अंगठ्या आणि तीन सोन्याचे नेकलेस यांसह सर्व दागिने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.या अनोख्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी हा प्रकार एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सुदैवाने सर्व दागिने सुरक्षित परत मिळाल्याने ज्वेलर्सने सुटकेचा निश्वास सोडला.
Comments
Add Comment

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण

MQ-9 Drones : इराण युद्धात MQ-9 ड्रोनचे नुकसान झाले तरी भारताने अमेरिकेसोबत अब्जावधींचा करार का केला? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या संघर्षात अमेरिकेच्या अत्यंत प्रभावी