Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांची हाव आणि चैनीचे आयुष्य जगण्याच्या हव्यासापोटी एकाच शाळेतील १० वीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्याच मुख्याध्यापिकेची २७ वार करून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे.



२७ वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह


कोंडामल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका कल्लू रूपा रेड्डी (वय ४८) यांची १२ ऑगस्टच्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. हैदराबादमध्ये असलेले त्यांचे पती रूपा यांना सतत फोन करत होते, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पतीने शेजाऱ्यांना पाहण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता रूपा रेड्डी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने तब्बल २७ वार करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने ५ पथके तयार करून सीसीटीव्ही, फॉरेन्सिक पुरावे, फिंगरप्रिंट्स आणि संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवत तब्बल ८० हून अधिक लोकांची चौकशी केली.



'बाबू' या एका शब्दाने दिला तपासाला दुजोरा


तपासादरम्यान पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडला. फोन बंद होण्यापूर्वी रूपा रेड्डी (Rupa Reddy) आपल्या मावशीशी बोलत होत्या आणि संभाषणातील त्यांचा शेवटचा शब्द 'बाबू' हा होता. पोलीस अधिकारी शरद चंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रूपा रेड्डी सहसा शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना 'बाबू' असे संबोधत असत. त्यामुळे हा गुन्हा शाळेतीलच मुलांनी केला असावा असा संशय बळावला." यानंतर पोलिसांनी १० वीच्या वर्गातील गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना निशाण्यावर धरले. त्यावेळी दोन विद्यार्थी अचानक प्रचंड पैसे उडवत असून मित्रांना महागड्या पार्ट्या देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.



वसतिगृहातून काढल्याचा राग अन् चोरीचा कट


संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी वसतिगृहात या विद्यार्थ्यांच्या बॅगेत रोख रक्कम आणि मोबाईल सापडल्याने मुख्याध्यापिका रूपा रेड्डी यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले होते. तसेच त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना हॉस्टेलमधून काढून 'डे-स्कॉलर' केले होते. याच रागातून आणि झटपट श्रीमंत होण्याच्या ध्यासातून विद्यार्थ्यांनी चोरीचा बेत आखला. त्यांनी यूट्यूबवर "कमी वेळेत जास्त पैसे कसे कमवायचे?" याचे व्हिडिओही पाहिले होते.



ओळख पटल्याने केला खुनी हल्ला; गोव्याला काढला पळ


गेल्या ५ दिवसांपासून ते मुख्याध्यापिकेच्या घराची रेकी करत होते. पुरावे सापडू नयेत म्हणून त्यांनी आधीच हातमोजे आणि चाकू खरेदी केला होता. घटनेच्या दिवशी तोंडावर मंकी कॅप घालून एका विद्यार्थ्याने घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील २.५० लाख रुपये चोरले. मात्र, पळून जाताना त्याची मंकी कॅप सरकली अन् मुख्याध्यापिकेने त्याला ओळखले. आपण पकडले जाऊ या भीतीने विद्यार्थ्याने त्यांच्यावर चाकूने २७ वार केले. हत्येनंतर रक्ताने माखलेले कपडे गाडून हे दोघेही मौजमजा करण्यासाठी थेट गोव्याला निघून गेले. पोलिसांनी आरोपींकडून १.५४ लाख रुपये रोख (ज्यावर रक्ताचे डाग आहेत), त्यांनी खरेदी केलेला नवा आयफोन आणि मृत मुख्याध्यापिकेचा फोन जप्त केला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

MQ-9 Drones : इराण युद्धात MQ-9 ड्रोनचे नुकसान झाले तरी भारताने अमेरिकेसोबत अब्जावधींचा करार का केला? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या संघर्षात अमेरिकेच्या अत्यंत प्रभावी

Viral News : 'आम्हाला शिकवायचे सोडून टॉयलेटमध्ये जाऊन..'; शिक्षक आणि शिक्षिकेचा प्रताप, विद्यार्थ्यांच्या आरोपाने खळबळ

छिंदावाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत

Lucknow Crime News : पत्नीला बँकेबाहेर बोलावले अन् गोळी झाडली; व्हाट्सअँप स्टेटसने खळबळ उडवली

लखनौमधील पॉश गोमतीनगर भागात गुरुवारी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे.

Benefits Of Eating On Banana Leaf : ...म्हणून दक्षिण भारतात केळ्याच्या पाण्यावर जेवण्याची परंपरा आहे!

दक्षिण भारतात कोणत्याही सण-समारंभाला किंवा पारंपरिक लग्नसमारंभात केळ्याच्या पानावर जेवण वाढण्याची पद्धत