Devendra Fadnavis : कुंभमेळ्याआधी शिर्डी विमानतळावरील एअर कार्गो सुविधा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी


मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा-२०२७ पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Devendra Fadnavis )


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची ९३ वी बैठक मंत्रालयात झाली. बैठकीस एमएडीसीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, आयुक्त विपिन इटनकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Devendra Fadnavis )



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीमध्ये एमएडीसीसोबत सिडको, एमआयडीसी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचा सहभाग असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देत सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत.कुंभमेळा-२०२७ दरम्यान देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येणार असून चार्टर्ड विमानांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा अपेक्षित आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळावरील टॅक्सीवे, एप्रन, एअर कार्गो कॉम्प्लेक्स तसेच इतर आवश्यक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.



राज्यातील विमानतळांच्या विकासाला वेग


एमएडीसीमार्फत नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि अमरावती या सात विमानतळांचा विकास करण्यात येत असून रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे.बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी ६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लातूर विमानतळासाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कराड विमानतळाच्या १,७०० मीटर धावपट्टीच्या विस्ताराची कार्यवाही सुरू असून भविष्यात येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तसेच चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब तसेच धाराशिव आणि यवतमाळ येथील विमानतळ करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.



नांदेड विमानतळावर आधुनिक टर्मिनल


नांदेड विमानतळावर अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल उभारण्यात येणार असून येथे प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या नऊ विमानसेवा उपलब्ध असून चंदीगड आणि अमृतसर येथून नांदेडसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.



एमएडीसीकडून मिहान परिसरात विविध प्रकल्पांना चालना


मिहान परिसरात एमएडीसीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थच्या माध्यमातून एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी राज्य शासनाकडून जमीन उपलब्धतेस मंजुरी देण्याची विनंती बैठकीत करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यात नवीन विमानतळासाठी जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू असून अमरावती विमानतळावर फ्लाईट ट्रेनिंग स्कूल सुरू होत असून नाईट लँडिंग सुविधेसाठी डीजीसीएकडून अंतिम तपासणी करण्यात येणार आहे.



विमानसेवांना गती, सी-प्लेन सेवा आणि प्रशिक्षण केंद्र


सोलापूरच्या होटगी विमानतळासाठी उडान योजनेअंतर्गत राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच मुंबई–सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.पवना, कोराडी, गंगापूर, रत्नागिरी आणि गणपतीपुळे येथे सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली. देश व राज्यातील विमान प्रवासी 2035 पर्यंत मोठ्या संख्येने वाढणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.रत्नागिरी विमानतळावरील कामे जवळपास पूर्ण झाली असून हा परिसर कोस्ट गार्डच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे आवश्यक परवानग्या प्राप्त करून विमानतळ लवकरच कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Comments
Add Comment

Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि