मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग
मुंबईच्या पर्यटनाला मिळणार मोठी चालना, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगत प्रस्तावित असलेल्या सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील लँडस्केप गार्डनला सर्वसामान्य मुंबईकर तसेच पर्यटकांना सहजपणे पोहोचता यावे, यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक (मेट्रो - ३) ते वरळी प्रॉमेनेड व लँडस्केप गार्डनला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. या भूमिगत मार्गासाठी आवश्यक ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार ७ रूपये खर्च मुंबई महानगरपालिका करणार असून, मार्गाच्या उभारणीचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली. ( Nehru Science Centre)
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला असता मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी आमचा विरोध प्रकल्प कामाला नसून महापालिकेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या आर्थिक निधीबाबत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी हवा तर शासनाने निधी द्यावा. महापालिकेने निधी द्यायचा आणि एमएमआरसीएलचे नाव होणार. त्यामुळे एमएमआरएसीएलने हवे तर बांधकाम करावे, पण त्यामुळे या वारेमाप खर्चाला आमचा विरोध असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. मनसेचे जमीर कुरेशी यांनी ७०२ कोटी रुपये आपण एमएसआरडीसी दिली जात आहे, तर अशाप्रकारे कधी मदत अन्य प्राधिकरणांना केली होती का असा सवाल केला.तसेच टीओडीचा प्रिमियम महापालिकेला कधी मिळणार अशी विचारणा केली. तर तर अश्रफ आझमी यांनी प्रकल्पाला विरोध नाही, पण एका बाजुला महापालिका बाँड काढायला निघाले, अडीच लाख कोटींची कामे हाती घेतली आहे, अशा परिस्थितीत महापालिकेने एमएमआरसीएला आपण कसे पैसे देतो असा सवाल करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. तसेच हा पादचारी मार्ग महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून जोडला जावा अशीही सूचना केली. तर डॉ सईदा खान यांनी रेल्वे स्थानक कनेक्टिवीटी असणे आवश्यक असून अमेरिकेत भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यात येत नाही. तर त्याचाही अभ्यास करावा अशी सूचना केली. श्रध्दा जाधव यांनी मेट्रो रेल्वेचे प्रवाशी वाढवण्यासाठीचा प्रयत्न असून त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतील पैसा कशाला असा सवाल केला. तर राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा अशी सूचना केली. तर ऍड मकरंद नार्वेकर यांनी विरोधक हे कायमच विरोध करतील. पण करदात्यांचे पैसे घेवून एफडीमध्ये गुंतवून व्याज कमवण्यासाठी नाही असा सवाल करत मुंबईच्या विकासाचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले. तर शैलेश फणसे यांनी पादचारी मार्गाला विरोध नाही, पण याची माहिती मिळावी म्हणून फेरविचारासाठी हा प्रस्ताव पाठवण्याची आमची मागणी आहे. त्यामुळे यासाठी ७एफएसआयचा लाभ कधी आणि किती मिळणार, कारण अनेक विकासकांकडे टीडीआर पडून आहे. तो विकला जात नाही, मग आपल्याला कधी मिळणार असा सवाल केला.भुयारी मार्गातील पादचाऱ्यांची सुविधा, आणि सुरक्षा काय असेल असा सवाल करत सरकारच्या निधीतून हा पादचारी मार्ग बनवण्याची मागणी केली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी मेट्रो रेल्वे प्रवाशी, कोस्टल रोडवरील वाहतुकीचा आकडा सांगत विस्तारीत कोस्टल रोड आणि हा विकास कामांची काय गरज आहे हे सांगितले. ( Mumbai Development)
नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात गुन्हा ...
यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्हणाले की, सागरी किनारा रस्ता हा मुंबईकरांसाठी स्वप्नवत आणि पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पालगत सुमारे ३०० एकर क्षेत्रावर भव्य लँडस्केप गार्डन उभारण्याचे प्रस्तावित आहे. या गार्डनसोबतच नागरिकांसाठी सागरी किनारा मार्गावरील राखीव प्रॉमेनेड उपलब्ध होणार आहे. मात्र, सद्यस्थितीत या परिसरात चारचाकी वाहनाने पोहोचणे तुलनेने सोपे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून किंवा पायी सहज पोहोचण्यासाठी सक्षम जोडणी उपलब्ध नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्रस्तावित भूमिगत पादचारी मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ( Mumbai News)
या कामासंदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून २०२५ मध्ये भूमिगत बोगदा उभारणीचे काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी हे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फतच करण्यास मान्यता दिली. या कामासाठी आवश्यक आर्थिक भार मुंबई महानगरपालिकेकडून उचलण्याचेही निश्चित करण्यात आले. मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी होत आहे. याच भूमिकेतून मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मेट्रो - ३ प्रकल्पासाठी सुमारे २ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता नागरिकांच्या हिताचा हा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्यासाठीही आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याची तयारी महानगरपालिकेने दर्शविली आहे. ( Nehru Science Centre Metro)
काही जणांना पोटशूळ उठण्याचे कारण काय, हे अनाकलनीय आहे. कंत्राटी कामांमधील मलिद्याची सवय असलेल्या मंडळींना हा प्रस्ताव पचनी पडत नसल्याचे दिसते. मात्र, भारतीय जनता पक्षासाठी मुंबईकरांचे हित सर्वोच्च असून, नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि सुलभ पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे, असा टोलादेखील स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी लगावला. (BMC)