Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 10 जण जखमी झाले असून त्यांना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Mumbai Crane Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, एका 17 मजली बांधकामाधीन इमारतीवर पोकलेन मशीन नेण्यासाठी हायड्रॉलिक क्रेनचा वापर करण्यात येत होता. या ठिकाणी एम/एस सनी कंपनीकडून पाडकामाचे काम सुरू होते. क्रेनच्या सहाय्याने पोकलेन वर नेण्याचे काम सुरू असताना क्रेनचा काही भाग थेट रेल्वेच्या हाय टेन्शन ओव्हरहेड वायरवर पडला. (Crane Accident)


क्रेनचा काही भाग क्यूरेशी नगर परिसरातील झोपड्यांवर तसेच सम्राट अशोक नगरच्या रस्त्यावर पडला. याशिवाय म्हाडाच्या इमारतीच्या कंपाउंड वॉलचेही नुकसान झाले आहे. म्हाडा इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या तीन ते चार चारचाकी वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai News)



या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले. त्यापैकी 8 जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर 2 जणांवर कुर्ला भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Sion hospital)


सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये जगरुल्ला नबी मोहम्मद खान (63) , 3 महिन्यांचा अहमद नियाज अहमद, अतिकुर रहमान (60), हकुम शेख (36), नुमान खान (21), रेहमान खान (19),  सुरज गौर (10) आणि अकबर (40) यांचा समावेश आहे. (MMRDA)


कुर्ला भाभा रुग्णालयात राजू गौड (35) आणि आरती गौड (30 ) यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ( Kurla Bhabha Hospital)


या दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली असून, क्रेन नेमकी कशामुळे कोसळली, याचा तपास करण्यात येत आहे. (Mumbai )

Comments
Add Comment

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर