Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या विकासकामादरम्यान एक मोठी क्रेन थेट कुर्ला-ट्रॉम्बे सिंगल रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायरवर कोसळली. त्यानंतर क्रेन रेल्वे रुळावर आली. या दुर्घटनेत परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले असून 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Mumbai Crane Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडे3 वाजण्याच्या सुमारास घडली. विकासकाम सुरू असताना अचानक क्रेनचा समतोल बिघडला आणि ती रेल्वे मार्गाच्या दिशेने कोसळली. क्रेन ओव्हरहेड वायरवर पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती आणि त्यांच्या दुखापतींची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Mumbai News)



या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना झोपडपट्टी आणि रहिवासी वसाहती आहेत. क्रेन कोसळल्यामुळे या भागातील काही घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


प्राथमिक माहितीनुसार, क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिचा समतोल बिघडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून या घटनेची पाहणी करून कारण शोधले जात आहे. (Kurla Trombay Accident)


रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायरचे नुकसान झाल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. क्रेन हटवणे आणि रेल्वे मार्ग सुरक्षित करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून हाती घेण्यात येणार आहे. या दुर्घटनेबाबत अधिकृत तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने