Ahilyangar : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, संतापाच्या भरात सासूने केलं असं काही की...

Ahilyangar : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग अनावर झाल्याने तिच्या आईने केलेल्या या एका कृतीची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने भडकलेल्या आईने मुलीच्या पतीला थेट न्यायालयाच्या आवारात अडवण्याचा प्रयत्न केला. बरं यानंतर मुलीची आई चक्क जावई चालवत असलेल्या कारच्या बोनेटवर जाऊन बसली. धक्कादायक म्हणजे मारहाणीच्या भीतीने त्याने कार पळवली मात्र तरीही आई खाली उतरली नाही.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील मातापूर येथील एका तरुणीने दहा दिवसांपूर्वी केसापूर येथील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मुलगी घरातून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, दोघांनीही विवाह केल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात (Court) पोहोचले. सोमवारी दोघेही न्यायालयात हजर झाले. ते सज्ञान असल्याने न्यायालयाने त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. मात्र, हा विवाह मुलीच्या आईला मान्य नव्हता.



सासू थेट जावयाच्या कारच्या बोनेटवर चढली अन्


न्यायालयाबाहेर येताच तिने जावयाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि थेट त्याच्या कारच्या बोनेटवर जाऊन बसली. घाबरलेल्या तरुणाने कार सुरू केली. तरीही ती महिला बोनेटवरून खाली उतरली नाही. न्यायालय परिसरापासून सय्यदबाबा दर्गा परिसरापर्यंत हा थरार सुरूच होता. दरम्यान, महिलेने कारची काच फोडण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी कार थांबवली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत वाद मिटवला.


दोघेही सज्ञान असल्याने त्यांचा विवाह कायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच कारच्या नुकसानीबाबत तरुणाने कोणतीही तक्रार दिली नाही, तर महिलेनेही गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने हे प्रकरण अखेर समोपचाराने निकाली काढण्यात आले.

Comments
Add Comment

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Daund electricity two brother die : दौंडमध्ये काळीज पिळवटणारी घटना; विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, आई सुदैवाने बचावली

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षितता बाळगणे किती गरजेचे आहे, याचा एक अत्यंत हृदयद्रावक

Ahilyadevi Holkar Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ

- राज्य सरकारचा निर्णय; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेसाठी मानक कार्यप्रणाली