Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार
- स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची अंमलबजावणी


मुंबई : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील लाखो सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (हाऊसिंग सोसायट्या) स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न आणि महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात धोरण निश्चित करून अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.


मंत्रालयात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी विशेष बैठकी झाली. आमदार प्रवीण दरेकर,आमदार संजय केळकर उपस्थित होते. या बैठकीत सोसायट्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सध्या अनेक संस्था युडीसीपीआर मध्ये समाविष्ट नसल्याने त्यांच्या स्वयंपुनर्विकासात अडचणी येत आहेत, ही संपूर्ण राज्याची परिस्थिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २०१९ च्या शासन निर्णयानुसार इतर करांमध्ये सवलत देण्याचे आणि १० टक्के प्रोत्साहन (इन्सेन्टिव्ह) देण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, स्वयंपुनर्विकासासाठी 'वर्क कॉन्ट्रॅक्ट' आणि 'डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट' बाबतचा सुटसुटीत मसुदा तयार करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. फायनान्स विभागाकडून ४ टक्के सवलत मिळणे आवश्यक असून, त्यासाठी गृहनिर्माण विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा आणि नोंदणी महानिरीक्षकांकडून याबाबत स्पष्टता आणावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.


राज्यात सध्या सुमारे १ लाख १५ हजार नोंदणीकृत सोसायट्या असून, त्यापैकी तब्बल ६० ते ७० हजार सोसायट्यांचे अद्याप 'डीम्ड कन्व्हेअन्स' झालेले नाही. सहकार, महसूल, जमाबंदी आणि आयजीआर विभागांच्या समन्वयाने ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांच्या मालमत्ता पत्रकावर (प्रॉपर्टी कार्ड) किंवा सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांमध्ये आता थेट सोसायटीच्या नावाची नोंद करण्यात यावी, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी केल्या आहेत.



म्हाडा सोसायट्या आणि युएलसीबाबत निर्णय


म्हाडामधील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी शासनाने अकृषिक कर यापूर्वीच रद्द केला आहे. तरीही काही ठिकाणी तो वसूल केला जात असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले. यासोबतच इमारतींमधील नागरी कमाल जमीन धारणा (युएलसी) आरक्षित असलेल्या सदनिकांबाबत योग्य कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०

Daund electricity two brother die : दौंडमध्ये काळीज पिळवटणारी घटना; विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, आई सुदैवाने बचावली

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षितता बाळगणे किती गरजेचे आहे, याचा एक अत्यंत हृदयद्रावक

Ahilyadevi Holkar Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ

- राज्य सरकारचा निर्णय; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेसाठी मानक कार्यप्रणाली