Cyber Crime : एनआयसीच्या डेटाबेसमध्ये घुसखोरी करून वाहनांना बोगस फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्याला अटक

बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अत्यंत गंभीर सायबर गुन्ह्यात, वाहनांची प्रत्यक्ष तपासणी न करताच बोगस फिटनेस प्रमाणपत्र जारी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा बीड पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून आशिष कडियान या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याने थेट राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) डेटाबेसमध्ये घुसखोरी करून देशाच्या सुरक्षिततेशी आणि सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. (Cyber Crime)



बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून वाहनांची प्रत्यक्ष तपासणी न करताच फिटनेस प्रमाणपत्रे ऑनलाईन दिली जात होती. या प्रकाराची व्याप्ती आणि तांत्रिक गुंतागुंत लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी वेंकटराम यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या पथकाने अत्यंत वेगाने तांत्रिक आणि सखोल तपास करत थेट उत्तर प्रदेश गाठले आणि नोएडामधून आरोपी आशिष कडियान याला अटक केली.



आरोपी आशिष हा नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड अंतर्गत काम पाहणाऱ्या व्हेलोसिस सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कर्मचारी आहे. आरटीओशी संबंधित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम तो करत असल्याने त्याला या प्रणालीतील तांत्रिक खाचाखोचा चांगल्याच माहीत होत्या. आपल्या पदाचा आणि तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करून त्याने एनआयसीच्या डेटाबेसमध्ये अनधिकृत फेरफार केले. व्यावसायिक वाहनांचे टॅक्स फायलिंग, सीएनजी स्टेटस बदलणे आणि ब्लॅकलिस्टमधून वाहने बाहेर काढणे असे गंभीर गैरप्रकार त्याने केल्याचे तपासात समोर येत आहे.(Cyber Crime)



स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्याने त्याने प्रणालीमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक त्रुटी ठेवली होती आणि एसक्यूएल इंजेक्शन या पद्धतीचा वापर करून तो डेटाबेसमध्ये मागच्या दाराने बेकायदेशीर बदल करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुरक्षेचे ऑडिट बायपास करून आणि पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा क्वेरी लॉग्स डिलीट करून त्याने हा अत्यंत गंभीर सायबर गुन्हा रचला. सध्या एका वाहनाच्या नोंदीतील फेरफार उघडकीस आला असला तरी, अशाच पद्धतीने अनेक वाहनांच्या नोंदीत बदल झाले असण्याची दाट शक्यता असून फॉरेन्सिक तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३४०(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ४३ (ब), ६६ (क) आणि ७२ अ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शासकीय डिजिटल यंत्रणेतील हा ढिसाळपणा आणि घुसखोरी सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.(Cyber Crime)

Comments
Add Comment

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक