Sugar Stock Rules : साखरसाठ्यावर केंद्राचे निर्बंध; ३० दिवसांपेक्षा अधिकचा साठा ठेवण्यास मनाई; कमाल मर्यादा ४,००० क्विंटल

नवी दिल्ली: अपुऱ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर देशात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. १ ऑगस्टपासून देशातील कोणत्याही साखर व्यापाऱ्याला साखरेचा साठा ३० दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. तसेच, कोणत्याही ठिकाणी एकावेळी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहतील. (Sugar Stock Rules)



अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी राजपत्रात यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली. अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ आणि साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. साखर व्यापाऱ्यांनी आपल्या साठ्याची माहिती सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर जाहीर करून ती नियमित अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. साठा किती दिवस ठेवला आहे, याची गणना करताना साखर प्राप्त झाल्याचा दिवसही ग्राह्य धरण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अंतर्गत रास्त भाव दुकानांमार्फत वितरणासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या वतीने साठविण्यात आलेल्या साखरेला या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या व्यापाऱ्यांनाही ही सूट लागू असेल. ( Central Government)



साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज


‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (आयएसएमए) २०२५-२६ हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी वळविलेली साखर वजा जाता देशात २९.३ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगामात हे उत्पादन २६.१२ दशलक्ष टन होते.

Comments
Add Comment

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण

Viral News : नवरी नटून-थटून मंडपात उभी होती, अचानक घडला असा प्रकार अन् थेट डॉक्टर बनून उपचारासाठी धावली

केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले

Navnath Ban : ‘छात्रों की गूंज’ की ‘पैसों की गूंज’? राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर भाजपचे गंभीर आरोप; १० कोटींच्या खर्चाचा दावा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून भाजपने गंभीर आरोप केले

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Bihar Accident : क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं! वाढदिवसाच्या कार्यक्रमात बस काळ बनून आली; बिहारमध्ये भयानक अपघात घडला

बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात

Nashik Kumbhmela : १२ कोटी भाविकांच्या स्वागताची तयारी, सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे

Nashik Kumbhmela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या