Nashik : नाशिककरांनो लक्ष द्या ! उद्या 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद

Nashik : नाशिककरांनो, उद्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. सातपूर परिसरातील मुख्य गुरुत्ववाहीनीला मोठी गळती लागल्याने मनपाला तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले आहे. त्यामुळे सातपूर आणि नाशिक पश्चिम भागातील अनेक परिसरांचा उद्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, त्यानंतरच्या दिवशीही कमी दाबाने पाणी मिळणार आहे.



मुख्य गुरुत्ववाहीनीला  गळती


सातपूर विभागीय कार्यालयासमोरील जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गुरुत्ववाहीनीला अचानक मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. या बिघाडामुळे सातपुर व नाशिक पश्चिम विभागातील दादासाहेब गायकवाड जलकुंभ, स्त्री मंडळ जलकुंभ, लव्हाटे नगर जलकुंभ, महात्मानगर जलकुंभ भरता आलेले नाही. मनपाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असले तरी हे काम मोठ्या स्वरूपाचे असल्याने बुधवार, २९ जुलै रोजी सातपूर विभागातील सकाळचा आणि नाशिक पश्चिम विभागातील दुपारचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Water supply shut off)



गुरुवार सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने 


यामध्ये दादासाहेब गायकवाड जलकुंभ परिसर, स्वारबाबा नगर, सातपूर गाव, राजवाडा, कांबळेवाडी, गौतम नगर, महादेव नगर, जीपी नगर, जगतापवाडी तसेच पश्चिम विभागातील स्त्रीमंडळ, लव्हाटे नगर, महात्मानगर जलकुंभ परिसर, कामगार नगर, सुयोजित लॉन्स, परीजात नगर, महात्मानगर आदी भागांचा समावेश आहे. याशिवाय गुरुवार, ३० जुलै रोजी सकाळचाही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. 

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक