Nashik News : नाशिक जिल्हयातील दिंडोरी, पेठ अन् सुरगाणा तालुक्यात मंगळवारी पुन्हा भूकंपाचे धक्के सौम्य धक्के बसले आहे. दिंडोरी तालुक्यातील वारे आणि वनारे परिसर तसेच पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर : नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त ...
तातडीने भूकंप मापक यंत्रणा बसवावी
तसेच पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा परिसरात ३.३० वाजेच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. याप्रकरणी दिंडोरी (Dindori Tehsil Office) आणि पेठ तहसील कार्यालयाकडून (Peth Tehsil Office) अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसली तरी या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात तातडीने भूकंप मापक यंत्रणा (Earthquake Monitoring System) बसवावी अशी मागणी माजी आमदार महाले यांनी केली आहे.
हाँगझोऊ : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय रायफल नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी १० मीटर एअर रायफल ...
आंबेवाडी डोंगराचा मोठा भाग खचला
सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असताना, दुसरीकडे अनेक शेतजमिनींमध्ये भेगा पडल्या असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने जमीन आणखी खचण्याची शक्यता बळावली आहे. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे डोंगराचा मोठा भाग खचून मोठे दगड, गोटे आणि मुरूम वेगाने खाली येत शेती खरवडून निघाली. आदिवासी भागातील शेती पूर्ववत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे.
Nashik Crime News : सायबर गुन्हेगार आता केवळ ओटीपी किंवा लिंक पाठवूनच नाही, तर कंपनीच्या सीईओचं बनावट प्रोफाइल तयार करूनही लाखोंची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत ...
नाशिकमध्ये भूगर्भीय हालचाली वाढल्या ?
मागील तीन दिवसांपासून सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यात भूगर्भात हालचाली होत आहेत. इगतपुरी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील डोंगराचा अंशतः भाग खचला असून डोंगरात चरीसारखा भाग तयार होऊन पाण्याचा प्रचंड ओहोळ वाहू लागला. या प्रवाहासोबत मोठे दगड, माती आणि मुरूम वेगाने खाली येऊन वनपट्टेधारक तसेच खासगी जमीनमालकांच्या शेतात पसरले. त्यामुळे शेती पूर्णपणे खरवडून निघाली आहे. भूकंपाचे धक्के बसलेल्या सुरगाणा परिसरातील घटना आणि इगतपुरीतील डोंगर खचण्याच्या घटनेचा थेट संबंध नसला, तरी दोन्ही ठिकाणी भूगर्भातील हालचालींचा समान धागा समोर येत आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही भाग मुसळधार पावसाच्या पट्ट्यात आहेत.






