Narendra Modi Selfie Video : फेसबुकला ती चूक महागात पडली! मोदींचा व्हिडिओ हटवल्याने 'मेटा'ने मागितली माफी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून फेसबुकवर (Facebook) शेअर केलेला बहुचर्चित 'सेल्फी व्हिडिओ' काही काळासाठी अचानक हटवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर 'मेटा'ने ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत व्हिडिओ पुन्हा पूर्ववत केला आणि अधिकृतपणे माफीही मागितली.


मेटाच्या (Meta) प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनात, "हा व्हिडिओ चुकून हटवण्यात आला होता. तांत्रिक अडचणीमुळे ही घटना घडली असून आता तो पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला आहे," असे स्पष्ट करण्यात आले आहे.



मात्र, या प्रकरणाची केंद्र सरकारने (Central Government) गंभीर दखल घेतली असून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्हिडिओ तात्पुरता हटवण्यामागील कारण स्पष्ट करण्यासाठी मेटाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा आणि इन्स्टाग्रामच्या जागतिक अधिकाऱ्यांनाही स्पष्टीकरणासाठी पाचारण केले आहे.



विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा व्हिडिओ :


पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी हा सेल्फी व्हिडिओ (Selfie video) गुरुवारी मध्यरात्रीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. विशेषतः सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जेन-झी तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. फेसबुकसह मेटाच्या विविध प्लॅटफॉर्मवर तो शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये NEET-UG प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोदी यांनी संयम आणि शांतता राखण्याचे आवाहन केले होते.



भाजपची 'मेटा'वर जोरदार टीका :


फेसबुकवर (Facebook) हा व्हिडिओ भारतातील काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर भाजपने मेटावर जोरदार निशाणा साधला. भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया विभागाच्या राष्ट्रीय प्रभारी तसेच महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत प्रवक्त्या प्रीती गांधी यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान भारतातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांचा पहिला सेल्फी व्हिडिओ (Selfie video) पोस्ट करतात आणि फेसबुक त्यावर निर्बंध घालते?"


पुढे त्यांनी मेटाला थेट सवाल करत विचारले, "कोट्यवधी भारतीयांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे ठरवण्याचा अधिकार मेटाला कोणी दिला? हा केवळ कंटेंट मॉडरेशनचा विषय नाही, तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संभाव्य राजकीय पूर्वग्रह यासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार आहे."


दरम्यान, मेटाने चूक मान्य करत व्हिडिओ पूर्ववत केला असला तरी, या प्रकरणावर केंद्र सरकारची चौकशी सुरू असून त्यातून पुढे कोणते निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय