शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात पाच पर्यटक वाहून गेले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एका पर्यटकाचा अद्याप शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड, कल्याण, शहापूर आणि भिवंडी परिसरातील सुमारे ३०० ते ४०० पर्यटक रविवारी चोंढे येथील हनुमान धबधबा पाहण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरू झाल्याने धबधब्याचा पाण्याचा प्रवाह काही क्षणांतच प्रचंड वाढला आणि पर्यटकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. (Shahapur Rain)
मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम बंगालच्या ...
या दुर्घटनेत प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मिरकुटे यांना स्थानिकांच्या मदतीने आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, आकाश महेंद्र देशमुख यांचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला.
दरम्यान, दिनेश मेंडलकर हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध जीवरक्षक पथक, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे घेत आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडथळे येत असले तरी शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. (Shahapur Rain)
- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी शासनाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष ...
View this post on Instagram





