- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे
मुंबई (सचिन धानजी)
धारावीचा विकास करण्यासाठी शासनाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे बाधित होणार आहेत. मात्र, याची भरपाई म्हणून धारावीचा विकास झाल्यानंतर याच परिसरात ३० हजारांहून अधिक झाडे मोकळ्या जागेत लावली जाणार आहेत. एवढेच नाही तर नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांची सात वर्षांपर्यंतची देखभाल धारावी विकास प्रकल्प कामासाठी नियुक्त असलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत केली जाणार आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या सुमारे १७०० झाडांच्या बदल्यातही पालघर जिल्ह्यातील चहाडे गावात तब्बल २३ हजार झाडे लावली जाणार असल्याचे हमीपत्र संबंधित कंपनीने दिल्याची माहिती मिळत आहे. (Dharavi Development Project)
धारावी पुर्नवसन प्रकल्पातंर्गत, (Dharavi Development Project) शहर सर्वेक्षण क्र.०२ (भाग) आणि ३ (भाग), सब प्लॉट-बी, धारावी, नोटीफाईडएरिया (डीएनए), मुंबई येथील इमारतीच्या बांधकामानुसार प्रस्तावित उत्खननाच्या, वाहनमार्गिकेच्या कामात अडथळा करणारी वृक्ष काढण्यास संबंधित नवभारत मेगा डेव्हल्पर्स लिमिटेड कंपने परवानगी मिळण्यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील या बांधकामात सुमारे १६९३ झाडे बाधित होत असून यामध्ये एकूण ८७१ वृक्ष कापणे व ८२२ वृक्ष पुनर्रोपित करण्यात येणार आहे. मात्र, याबदल्यात पालघर जिल्ह्यातील चहाडे गावांत २२ हजार ९०४ झाडे लावली जातील असे हमी पत्र लिहून दिले आहे. (Dharavi Development Project)
पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून ...
येथील इमारतीच्या बांधकामानुसार प्रस्तावित खोदकामात कामात येणारी ८६४ वृक्ष तसेच उन्मळून पडलेली ०४ वृक्ष असे एकूण ८७१ वृक्ष कापणे व ८२२ वृक्ष पुनर्रोपित करणे अशी एकूण १६९३ वृक्ष काढण्यास परवानगी मिळावी यासंबंधीचा विनंतीचा प्रस्तावनवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड मे २०२६ केला आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या जागेवरील कामाच्या ठीकाणी १९९८ झाडे व ०७ झाडे उन्मळून पडलेल्या स्थितीत आहेत अशी एकूण २००५ (दोनहजार पाच) झाडे अस्तित्वात असल्याचे नमुद केले आहे. परंतु यासाठी जो आराखडा मंजूर झाला आहे. त्या जागेवरील उन्मळून पडलेल्या ०७ झाडासहित एकुण १६९३ वृक्ष नियोजित इमारतीच्या बांधकामानुसार उत्खननाच्या कामात बाधित होत आहेत. खोदकामात कामात बाधित होणा-या १६८६ तसेच उन्मळून पडलेली ०७ वृक्ष असे एकुण १६९३ वृक्षांपैकी ८७१ वृक्ष कापण्याच्या व ८२२ वृक्ष पुनर्रोपित करण्याच्या बदल्यात नवीन लावण्यात येणारी २२९०४ वृक्ष, तोडण्यात आल्याच्या दिनांकापासुन १५ दिवसांत लावण्यात येणार असल्याचे हमी पत्र दिले आहे. तसेच नवीन लावण्यात येणा-या झाडांची उंची ०६ फुटापेक्षा कमी नसेल असे हमीपत्र त्यांनी सादर केले आहे. तसेच नव्याने लागवड करण्यात येणारी वृक्ष स्थानिक प्रजातीची असतील. कापण्यात येणा-या वृक्षांच्या मोबदल्यात भरपाई वृक्षरोपण व पुनर्रोपित करण्यात येणारी वृक्ष हे पालघर तालुक्यातील चहाडे गावातील ९० एकर भूभागावर लावण्यात येणार आहेत,असेही नमुद केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Dharavi Development Project)
नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना, देशातील प्रत्येक युवकाला ...
तसेच धारावी पुर्नविकास प्रकल्पातंर्गत अंदाजे ८००० वृक्ष बाधित होणार असुन त्याकरीता भरपाई वृक्षारोपण म्हणुन सुमारे ३०००० एवढी झाडे धारावी पुर्नविकास प्रकल्प क्षेत्रातील भुभागावरील उपलब्ध मोकळ्या जागेत लावण्यात येतील. नवीन लावण्यात आलेल्या झाडांचे ०७ वर्षांपर्यंत जतन व संवर्धन संबंधित नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येईल, असे त्यांनी हमीपत्रात नमुद केले आहे, तसेच चहाडे गावाच्या जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर केले आहे,असेही नमुद केले आहे. (Dharavi Development Project)






