Paach Futaacha Bachchan: 'पाच फुटाचा बच्चन' कीर्तनकार कन्येची गोष्ट लवकरच आपल्या भेटीला ; आषाढी एकादशी दिवशी पोस्टर आउट!

मुंबई : नाटकाचे रुपांतर चित्रपटात होण्याच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका नव्या सिनेमाचे नाव जोडले गेले आहे. लोकप्रिय ठरलेले एकपात्री प्रयोगशील नाटक 'पाच फुटाचा बच्चन' आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.


कीर्तन परंपरा आणि विठ्ठल भक्तीचा जागर:
प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरवरून हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरेशी निगडीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका तरुण कीर्तनकार मुलीची कथा आणि तिच्याभोवती रिंगण घालून कीर्तनात रंगलेले वारकरी असे या पोस्टरचे स्वरूप असून, या टीझरने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.


तगडी स्टारकास्ट आणि अनुभवी तंत्रज्ञ:
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे, तर राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.


चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


छायांकन: अभिषेक शेटे


संकलन: सौरभ प्रभुदेसाई


ध्वनी आरेखन: शांतनु-दिनेश


संगीत: निरंजनेडगावकर


गीतलेखन: प्रदीप आवटे


तथापि, चित्रपटातील मुख्य भूमिका 'पाच फुटाचा बच्चन' नक्की कोण साकारणार, हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.



नाटकापासून ते चित्रपटाच्या प्रवासापर्यंत:
दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 'पांच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले. अनेक पुरस्कार आणि महोत्सवांमध्ये गौरव झाल्यानंतर या नाटकावर चित्रपट बनवण्याची कल्पना पुढे आली.
गेल्या वर्षभरात सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

Comments
Add Comment

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता