BADLAPUR: महाराष्ट्रातील बदलापूर शहरातून एक अतिशय संतापजनक आणि आरोग्याशी खेळणारा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रसिद्ध बेकरीच्या केकमध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेविकेला गंभीर त्रास झाल्याची घटना घडली असून, या गंभीर प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक तात्काळ बेकरीत दाखल झाले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा ...
नेमकी घटना काय घडली?
बदलापूरमधील बेलवली आणि कात्रप परिसरात 'अय्यंगार फ्रेश केक' (Iyengar Fresh Cake) नावाची बेकरी आहे. या बेकरीचे शहरात दोन शॉप्स आहेत. स्थानिक नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी काही पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी बेलवली येथील या बेकरीतून एक रवा केक आणण्यात आला होता. हा केक खात असताना हर्षाली गायकवाड यांना केकमध्ये काहीतरी अयोग्य असल्याचा संशय आला. बारकाईने पाहिल्यावर केकमध्ये चक्क उंदराची विष्ठा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्यांना तीव्र मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला.
- पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) पदाच्या ...
बेकरी कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि उघड झालेले सत्य
या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी थेट संबंधित बेकरीत धाव घेतली. जेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना याबद्दल जा विचारला, तेव्हा सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे ती उंदराची विष्ठा नसून 'चोकोचिप' असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायकवाड यांनी हा केक तपासणीसाठी (Testing) एफडीए व प्रयोगशाळेत पाठवण्याची तयारी दाखवताच, कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली आणि त्यांनी आपली चूक कबूल केली.
View this post on Instagram
टॉयलेटच्या कमोडवर केक बनवण्याची भांडी!
या प्रकारानंतर जेव्हा नगरसेविका गायकवाड यांनी बेकरीच्या आतील भागाची आणि प्रत्यक्ष केक बनवण्याच्या जागेची पाहणी केली, तेव्हा तिथले अत्यंत अस्वच्छ आणि बकाल वातावरण पाहून त्या थक्क झाल्या. बेकरीमध्ये खारीवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, केक बनवण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरली जाणारी भांडी चक्क टॉयलेटच्या कमोडवर ठेवण्यात आल्याचे किळसवाणे दृश्य पाहायला मिळाले.
Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या ...
एफडीएचे पथक दाखल; कडक कारवाईची मागणी
अन्नाच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बेकरीचा प्रताप समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ करणाऱ्या अशा बेकर्सवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ही बेकरी तात्काळ बंद करावी, अशी मागणी नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासह संतप्त नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी एफडीएच्या (FDA) पथकाने तातडीने पावले उचलत बेकरीची पाहणी केली असून, पुढील कडक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शहरात अन्न सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






